लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल शहर व आजूबाजूच्या परिसरात हेल्मेट न घालण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. हेल्मेट नसल्याने अनेकांना अपघातात जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे पनवेल वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यास सुरु वात केली आहे. जून २०१६ ते जून १७ या काळात १ हजार ९५० जणांवर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ७ लाख २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.पनवेल परिसरात वाढत्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांतर्फे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरूध्द कठोर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. वाहन अपघातांची संख्या वाढत असल्याने विनाहेल्मेट, वेगाने व दारूच्या नशेत वाहन चालविणे, विना परवाना व वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. परिसरात बेदरकारपणे रिक्षा, दुचाकी चालवणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.यामुळे सामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते.
हेल्मेट न घालणाऱ्यांकडून सात लाखांचा दंड वसूल
By admin | Updated: July 17, 2017 01:21 IST