शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
3
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
5
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
6
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
7
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
8
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
9
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
10
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
11
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
12
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
13
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
14
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
15
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
16
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
17
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
18
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
19
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
20
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

‘त्या’ मुली अद्यापही सुधारगृहातच

By admin | Updated: September 14, 2015 04:11 IST

नेरूळ पोलिसांनी आग्य्राच्या कुंटणखान्यातून नाट्यमयरीत्या सुटका केलेल्या त्या पाच मुलींच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेण्यास अद्याप कोणीही पुढे आलेले नाही.

नवी मुंबई : नेरूळ पोलिसांनी आग्य्राच्या कुंटणखान्यातून नाट्यमयरीत्या सुटका केलेल्या त्या पाच मुलींच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेण्यास अद्याप कोणीही पुढे आलेले नाही. त्यामुळे या पीडित मुलींना मागील महिन्याभरापासून सुधारगृहातच राहावे लागत आहे. तर त्यांच्या पालकांचा शोध लागलेला नसून सामाजिक संस्थांनी देखील पुनर्वसनासाठी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे.आग्रा येथील कश्मिरी बाजार परिसरातील कुंटणखान्यावर नेरूळ पोलिसांनी नाट्यमयरीत्या छापा टाकून २१ मुलींची सुटका केलेली आहे. या मुलींना देशभरातील विविध ठिकाणावरुन पळवून आणल्यानंतर त्यांच्याकडून देहविक्री करुन घेतली जात होती. त्यापैकी पाच मुली महाराष्ट्रातील आहेत. त्यानुसार इतर राज्यातील मुली संबंधित पोलिसांच्या ताब्यात देवून नेरुळ पोलिसांनी पाच मुलींना महाराष्ट्रात आणले होते. या पीडित मुली पुणे, कल्याण, लातूर व उस्मानाबादच्या राहणाऱ्या आहेत. त्यांच्यावर एक ते सात वर्षांपासून लैंगिक अत्याचार सुरु होता. तर प्रयत्न करूनही नरकयातनेतून त्यांची सुटका होत नव्हती. अखेर नेरुळ पोलिसांनी त्यांची सुटका केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचा शोध महत्त्वाचा होता. त्यानुसार मुलींनी राहत्या ठिकाणाची माहिती दिल्यानंतर संबंधित पोलिसांना नेरुळ पोलिसांनी पत्र पाठवून या प्रकाराची माहिती दिलेली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. मात्र एक महिन्याचा कालावधी उलटूनही पाचही मुलींच्या राहत्या ठिकाणच्या पोलिसांकडून प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे या मुलींच्या कुटुंबातील व्यक्तींचा शोधात नेरुळ पोलिसांनाच जंग पछाडावी लागणार आहे.पालकांचा शोध लागल्यानंतरही ते मुलींना स्वीकारतील का, असाही प्रश्न पोलिसांना सतावत आहे. यामुळे पाचही मुलींच्या पुनर्वसनासाठी समाजसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन देखील नेरुळ पोलिसांनी केले होते. यानंतरही कोणतीच संस्था पुढे न आल्याने आग्रा येथून सुटका झालेल्या मुलींना सुधारगृहातच खितपत राहावे लागत आहे.नरकयातना सोसल्यानंतर कुटुंबीयांकडे परत देण्याऐवजी पुनर्वसन व्हावे अशी त्या मुलींनी इच्छा आहे. परंतु ऐरवी महिलांवरील अत्याचाराविषयी गळा काढणाऱ्या एकाही समाजसेवी संस्थेने त्यांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे सुधारगृहाशी संलग्न समाजसेवकांच्या भूमिकेवर त्यांची नजर लागली आहे. (प्रतिनिधी)