शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अंथरुणाला खिळून असलेले मतदानापासून राहणार वंचितच, गृहमतदानाची सोयच नाही : राज्य निवडणूक आयुक्त

By नामदेव मोरे | Updated: December 24, 2025 09:45 IST

- नामदेव मोरे लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये ८५ वर्षांवरील अंथरुणाला खिळलेल्या आजारी, ज्येष्ठ नागरिकांसाठी ...

- नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये ८५ वर्षांवरील अंथरुणाला खिळलेल्या आजारी, ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहमतदानाची सोय होती. परंतु महापालिका निवडणुकीसाठी अशी सुविधाच देण्यात आलेली नाही. यामुळे  ज्येष्ठ नागरिक मतदानापासून वंचित राहाण्याची शक्यता आहे. अशा नागरिकांना नेमके मतदान करायचे कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली होती. राज्यातील सर्व मतदारसंघांतून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले हाेते. मुंबईत १० विधानसभा मतदारसंघांत १९५६ व ठाण्यात ८०० पेक्षा जास्त ज्येष्ठांनी गृहमतदानात सहभाग घेतला होता. ज्येष्ठांच्या उत्साहामुळे मतदानाचा टक्का वाढण्यासही मदत झाली होती. १०० पेक्षा जास्त वय असलेल्या अनेकांनी मतदान करून तरुणांनाही आवाहन केले होते. महापालिका निवडणुकीसाठीही या ज्येष्ठांनी मतदानात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. परंतु निवडणूक विभागाने याविषयी कोणतीही तयारी केलेली नाही. मतदान केंद्रावर ज्येष्ठांसाठी  व्हीलचेअर व इतर सुविधा दिल्या आहेत. पण घरामध्ये मतदानाची सोय केलेली नाही. 

गृहमतदानाची सोय नसल्यामुळे बेडरीडन नागरिकांची गैरसोय होणार आहे. या मतदारांना केंद्रापर्यंत कसे घेऊन जायचे, असा प्रश्न आहे.रवींद्र सावंत, काँग्रेस प्रवक्ते, नवी मुंबई

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु महापालिका निवडणुकीसाठी नियमांत गृहमतदानाची तरतूद नाही. यासाठी आवश्यक यंत्रणा नाही.दिनेश वाघमारे, आयुक्त, राज्य निवडणूक आयोग

English
हिंदी सारांश
Web Title : Bedridden voters miss out as home voting unavailable: Election Commissioner.

Web Summary : Unlike Lok Sabha, home voting isn't available for municipal elections. Bedridden, elderly voters will likely miss out, prompting concern over accessibility despite polling booth provisions.
टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporation Electionनवी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६