पनवेल : थर्टी फर्स्टच्या रात्री पनवेल परिसरात शांतता अबाधित ठेवण्यासाठी, अनुचित प्रकार रोखण्यासाठी तालुका प्रशासनाने काटेकोर नियोजन केले आहे. या भागातील हॉटेलवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. करमणुकीचा कार्यक्र म असेल त्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येईल. शिवाय, या हॉटेलच्या तपासणीसाठी सहा भरारी पथकेही तैनात केली आहेत. करमणुकीच्या कार्यक्र मासाठी संयोजकास परवानगी बंधनकारक राहणार असल्याची माहिती तहसीलदार दीपक आकडे यांनी दिली.पनवेल शहर, खांदा वसाहत, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली या वसाहती, त्याचबरोबर मुंबई-पुणे, मुंबई-गोवा या महामार्गावर मोठ्या प्रमाणात हॉटेल व बिअर बार आहेत. कर्नाळा विभागात रिसॉर्ट असून तिथे जुन्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागताकरिता पार्टीचे आयोजन केले जाते. विविध करमणुकीचे कार्यक्र म केले जातात.करमणुकीचे कार्यक्र म घेणाऱ्या संयोजकास २0 टक्के करमणूक कर भरावा लागणार आहे. ग्राहकांना पुरविले जाणारे खाद्यपदार्थ, मद्य पेयांच्या ५0 टक्के रकमेवर सध्याच्या प्रचलित शुल्क शासनजमा करणे आवश्यक आहे. प्रवेश तिकिटे करमणूक कार्यालयाकडून मंजूर करून घेणे बंधनकारक आहे.
थर्टी फर्स्टला परवानगी बंधनकारक
By admin | Updated: December 23, 2015 00:42 IST