शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवडी ते न्हावा-शेवा मार्गावर टोलसाठी नसणार बूम बॅरिअर, ऑस्ट्रेलियन कंपनी उभारणार इंटेलेंजेस ट्रान्सपोर्टेशन सीस्टिम

By नारायण जाधव | Updated: January 6, 2024 14:04 IST

टोल वसुलीसाठी बूम बॅरिअर नसलेला अटल सेतू देशातील पहिला मार्ग असणार आहे. ऑस्ट्रेलियन कंपनीस हा टोलनाका उभारण्याचे काम देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

नवी मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा २१,२०० कोटी रुपये खर्चाचा शिवडी ते न्हावा-शेवा अर्थात अटल सागरी सेतूवर कारसाठी २५० रुपये टाेल आकारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आपल्या बुधवारच्या बैठकीत घेतला तर सागरी सेतूवर जे टोलनाके  आहेत, तिथे ऑटोमॅटिक पद्धतीने टोल वसूल केला असणार आहे. त्यामुळे बूम बॅरिअर नसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. टोल वसुलीसाठी बूम बॅरिअर नसलेला अटल सेतू देशातील पहिला मार्ग असणार आहे. ऑस्ट्रेलियन कंपनीस हा टोलनाका उभारण्याचे काम देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रकल्पावर झालेला खर्च वसूल करण्यासाठी सुमारे ३० वर्षांसाठी पथकर आकारण्याचा निर्णय मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने घेतला असून, त्यासाठी नवी मुंबईतील उलवेजवळ शिवाजीनगर आणि चिर्ले (गव्हाण) या दोन ठिकाणी पथकर नाके उभारण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर या मार्गावरील पथकराचा दर मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील पथकरांपेक्षा कमी असल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे.

सिडको करणार पावणेआठ कोटींचा खर्च-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच या सागरी सेतूचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यासाठी नवी मुंबई विमानतळानजीकच्या जागेत पंतप्रधानांची सभा होणार आहे.-  विमानतळ प्रकल्पातील नियोजित जागेवर प्रवेशद्वार आणि बाहेर जाण्याचा मार्ग तसेच अंतर्गत रस्ते बनविण्यासाठी २ कोटी ६५ लाख रुपये आणि मैदान तयार करणे, मंडप बांधणे, वाहनतळाची सोय करण्यासाठी ५ कोटी २३ लाख अशी ७ कोटी ८८ लाख रुपयांची कामे सिडको करणार असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

१३३ कॅमेरे, ओपन रोड टोलिंग सीस्टम, खर्च ४२७ कोटींचा - मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने ऑस्ट्रेलियन कंपनीस ४२७ कोटी रुपये खर्चून इंटेलेंजेस ट्रान्सपोर्टेशन सिस्टिमची अंमलबजावणी करण्याचे काम दिले आहे. -  ज्यात प्रशासकीय इमारत, कमांड कंट्रोल सेंटर, रोड लाइट्स, इलेक्ट्रिकल आणि युटिलिटी वर्कमधील १३३ कॅमेरे असलेल्या ओपन रोड टोलिंग सिस्टमचा समावेश आहे. -  टोलनाक्यावर बूम नसल्याने शिवडी आणि नवी मुंबई विमानतळदरम्यानच्या प्रवासाची वेळ २० मिनिटांपेक्षा कमी होणार आहे. पॅकेज ४ अंतर्गत संपूर्ण पुलासाठी जीआयसीएच्या देखरेखीखाली  ऑस्ट्रेलियन कंपनी कॅप्शला (Kaspch) हे काम दिल्याचे सांगण्यात आले. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई