शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

निर्यात नाही, भाव कोसळले, कांदा आणतोय डोळ्यात पाणी

By नामदेव मोरे | Updated: March 4, 2023 09:39 IST

शेतकऱ्यांचे नुकसान : वारंवार निर्बंध लादल्याने आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम

- नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कांदा निर्यातीवर शासन वारंवार निर्बंध लादत असल्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर होऊ लागला आहे. अस्थिर वातावरणामुळे भारतीय कांद्याची मागणी घटत असून, त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होऊ लागला आहे. २०१२-१३ मध्ये देशातून तब्बल १६ लाख ६६ हजार टन कांदा निर्यात झाला होता. दहा वर्षानंतर २०२१-२२ मध्ये फक्त १५ लाख ३७ हजार टन कांदा निर्यात झाला आहे. दहा वर्षांनंतरही अपेक्षित निर्यातवाढ झालेली नसल्यामुळे उत्पादन वाढल्यावर देशातील भाव कोसळून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. 

देशात कांद्याचे उत्पादन वाढले असून, बाजारभाव कोसळू लागले आहेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाएवढाही बाजारभाव मिळत नाही. शेतकरी हतबल झाला असून, कांदा फेकून द्यायची वेळ आली आहे.  चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची टीका होत आहे. 

भारतीय कांद्याला जगभर मागणीभारतीय कांद्याला जगभर मागणी आहे. परंतु जगभरातून मागणी वाढली की देशातून निर्यातबंदी होत असते. निर्यातीवर वारंवार बंधने लादली जात असल्यामुळे त्याचा परिणाम व्यापारावर होऊ लागला आहे. यामुळे अनेक देशांनी भारतीय कांद्यावर अवलंबून न राहता इतर पर्यायांना पसंती देण्यास सुरुवात केली आहे. भारतामधून यूएई, इंडोनेशिया, कतार, कुवेत, सौदी अरब या देशांमध्ये होणारी निर्यात कमी झाली आहे. दहा वर्षांपूर्वी भारतामधून १६ लाख ६६ हजार टन कांद्याची निर्यात होत होती. दहा वर्षात एक लाख २९ हजार टन निर्यात घटली आहे. शासनाने कांदा निर्यातीमधील हस्तक्षेप कमी करावा. निर्यातवाढीला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.

शासनाने कांदा निर्यातीमधील हस्तक्षेप थांबविला पाहिजे. वारंवार निर्यातबंदी केल्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर होत आहे. अपेक्षित गतीने निर्यात वाढली नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नाही. उन्हाळ्यातील कांद्याला भाव मिळाला नव्हता. आता नवीन कांद्याचेही दरही पडले असून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून, ते थांबविण्यासाठी निर्यातीमधील हस्तक्षेप थांबणे आवश्यक आहे. - अनिल घनवट, अध्यक्ष, स्वतंत्र भारत पार्टी  

टॅग्स :onionकांदा