शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांनो सावधान! ती गृहप्रकल्पांची लिंक सिडकोची नाही, खासगी बिल्डरांची...

By नारायण जाधव | Updated: August 4, 2022 09:43 IST

९० हजार घरांचे बांधकाम सुरू : बिल्डरांनी काढला नवा फंडा

- नारायण जाधव लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सिडकोकडून नवी मुंबईतील विविध नोडमध्ये ९०  हजार घरांचे  बांधकाम सुरू आहे. यातील काही घरे पूर्ण होत आली आहेत. याचाच गैरफायदा घेत काहींनी  सिडकोच्या नावाने ग्राहकांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. हा ग्राहकांच्या डेटा चोरीचा प्रकार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यामुळे अशा सर्वेक्षणापासून सावध राहावे, असे आवाहन सिडकोने केले आहे. 

या सर्वेक्षणाच्या माध्यमातून सिडकोचे नाव वापरून बिल्डर मंडळी कोणत्या ग्राहकास कोणत्या आकाराची सदनिका हवी आहे, ती कोणत्या नोडमध्ये हवी आहे, याची माहिती भरून घेतात. केवळ ग्राहकांचा डेटाच नव्हे तर सिडकोचे संभाव्य ग्राहकही पळविण्याचा काही बिल्डरांचाच  प्रयत्न असल्याचा प्रकार असावा, असे सांगण्यात  येत आहे. मात्र, याबाबत सिडकोकडून थेट प्रतिक्रिया मिळत नसल्याने ग्राहकही संभ्रमात आहेत. यामुळे सिडकोच्या नावे जी लिंक व्हायरल करण्यात येत आहे, ती ओपन करू नये. केल्यास माहिती भरून  सबमिट करू नये, अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते. कारण या माध्यमातून तुमच्याविषयीची सर्व  माहिती, तुमचा मोबाइल नंबर, ई-मेल  आयडी, तुम्हाला कोणत्या आकाराची सदनिका हवी आहे, कोणत्या  नोडमध्ये हवी आहे, ही सर्व माहिती संबंधितास आपसूक मिळणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. यामुळे यावर सिडकोने  ठोस भूमिका घ्यायला हवी, अशी मागणी होत आहे.

 काय आहे  त्या लिंकमध्ये?सिडकोच्या प्रधानमंत्री महागृहनिर्माण योजना या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत अंमलबजावणी आणि व्यवस्थापनासाठी योजना पात्र खरेदीदारांना १ बीएचके आणि २ बीएचके घरांसाठी ६७,००० युनिट्स प्रदान करणार आहे. नवी मुंबईतील वाशी, तळोजा, खारघर, कळंबोली, पनवेल, कामोठे, जुईनगर, मानसरोवर, खांदेश्वर, बामणडोंगरी आणि खारकोपर अशा विविध महत्त्वाच्या ठिकाणी ही घरे आहेत. आम्ही इच्छुक खरेदीदारांसाठी सखोल सर्वेक्षण करत आहोत. नवी मुंबईतील सिडकोच्या प्रधानमंत्री महागृहनिर्माण योजना प्रकल्पात ज्या खरेदीदारांना घर खरेदी करण्याची इच्छा आहे, कृपया त्यांनी खालील लिंक वापरून सर्वेक्षण भरा, असे आवाहन त्यात केले आहे.

‘सिडकोकडून सर्वेक्षण नाही’ पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात सिडकोने असे कोणतेही सर्वेक्षण सुरू केलेले नाही, असे  सिडकोच्या  जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :cidcoसिडको