शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळाच्या स्वप्नपूर्तीचे खरे ‘हीरो’

By नारायण जाधव | Updated: October 13, 2025 10:22 IST

या यशात १९९७ पासून ते आतापर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्यांचा सिंहाचा वाटा...

नारायण जाधव, उपवृत्तसंपादकआंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर नवी मुंबई शहराचे नाव जगाच्या हवाई नकाशावर झळकले आहे. या यशात १९९७ पासून ते आतापर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्यांचा सिंहाचा वाटा आहे. यात शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नावे घ्यायलाच हवीत. मात्र, सैन्य पराक्रमी असले, तरच यश मिळते, असे म्हणतात. या सर्वांना सिडकोतील उमद्या अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. किंबहुना पडद्यामागचे हेच लाेक खरे ‘हीरो’ आहेत, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.

नवी मुंबईच्या प्रारंभी आर. सी. सिन्हा यांनी विमानतळाची बिजे रोवली. त्यांनीच प्रथम सिटी एरोड्रोम तयार करण्याचा प्रस्ताव दिला. नंतर सहव्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सुरुवात करून जमीन खरेदी, पर्यावरणीय परवानग्यांसाठी समन्वय साधला. जी. एस. गिल यांच्या काळात २००८ मध्ये केंद्र सरकारने विमानतळास मंजुरी दिली. २०१० मध्ये तानाजी सत्रेंनी वने व पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळवून मोठा अडथळाच दूर केला नाही, तर प्रकल्पग्रस्तांना २२.५ टक्के भूखंडाचे भरभक्कम पॅकेजही दिले.

विमानतळाने खरा वेग संजय भाटिया यांच्या काळात पकडला. भाटियांनी पुनर्वसन आणि पुनर्स्थापना धोरण तयार केले. यात त्यांना व्ही. राधा यांच्यासारख्या संवेदनशील महिला अधिकाऱ्याची साथ मिळाली. त्यांनी प्रकल्पग्रस्तांची नाराजी दूर करण्यासाठी जिवाची पर्वा न करता बाधित गावागावांत भेटी देऊन बचत गटांच्या महिलांचे मन वळविले.

यानंतर भूषण गगराणी यांच्यासारखे समाजमन जाणणारे नेतृत्व सिडकोस लाभले. विमानतळ ही पायाभूत सुविधा नाही; ते दीर्घकालीन नातेसंबंध निर्माण करण्याची भूमिका मांडून प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या त्यांनी मंजूर केल्या. याकामी त्यांना तेव्हाच्या सहव्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगारे यांनी मोलाची साथ दिली. राधा यांचे अधुरे कार्य त्यांनी खऱ्या अर्थाने पूर्ण केले. गगराणी आणि लवंगारे यांच्या प्रयत्नांमुळेच १८ फेब्रुवारी २०१८ रोजी नरेंद्र मोदींनी भूमिपूजन केले. यानंतर लोकेश चंद्रांनी व्यवस्थापकीय संचालक म्हणून विमानतळ वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने अडथळे दूर केले, तर संजय मुखर्जी यांनी व्यवस्थापकीय संचालक म्हणून विमानतळ प्रकल्पाच्या अंतिम टप्प्याचा कळस गाठून त्यासाठी लागणाऱ्या १,१६० हेक्टर जागेचे भूसंपादन पूर्ण केले. एवढेच नाही, तर जीव्हीकेकडून अदानी समूहाकडे हस्तांतरणाची जटिल प्रक्रियादेखील पार पाडली. नंतर अनिल डिग्गीकर यांनी विमानतळ उभारण्याचे वेळापत्रक पाळण्यावर भर देऊन सिम्युलेशन चाचणीचा टप्पा पूर्ण केला.

विजय सिंघल यांच्या नेतृत्वात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने सर्वांत रोमांचक टप्पा गाठून ११ ऑक्टोबर २०२४ रोजी पहिले यशस्वी लँडिंग साजरे झाले, तर ८ ऑक्टोबर २०२५ रोजी उद्घाटन झाले. सिंघल यांनीच एरोसिटी, एज्युसिटी, मेडिसिटी, स्पोर्टस् सिटीची संकल्पना मांडून यशाचा कळस गाठला.

यांचेही मोलाचे योगदानसिडकोचे पहिले नियोजनकार आर. के. झा यांच्यासह सत्येंदू सिन्हा, सोमा विजयकुमार, गीता पिल्लई, संजय चौधरी, आर. बी. धायटकर, अपर्णा वेदुला, अरविंद जाधव, जे. आर. कुलकर्णी, अरुण देशमुख, दिवाणजी पवार या अभियांत्रिकी, नियोजनकार, भूसंपादन अधिकाऱ्यांनी मोठे योगदान दिले. सर्वांच्या मेहनतीला दिवंगत बुद्धभूषण गायकवाड यांच्यासह मोहन निनावे, प्रिया रातांबे या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी देऊन सिडकोचे कार्य जगासमोर आणून मोलाची भूमिका निभावली.

English
हिंदी सारांश
Web Title : Real Heroes Behind Navi Mumbai Airport Dream Realization

Web Summary : Behind Navi Mumbai Airport's success, CIDCO officials played a crucial role. From land acquisition to approvals and rehabilitation, officers diligently worked, making the dream a reality.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ