शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

फळांच्या राजाचे राज्य सुरू! एक हजार टन आंब्याची आवक : गुढीपाडव्यापर्यंत एक लाखाचा टप्पा गाठणार

By नामदेव मोरे | Updated: March 28, 2024 18:52 IST

बाजार समितीमध्ये हापूस आंब्याला प्रतिडझन २०० ते ८०० रुपये डझन भाव मिळत आहे. कर्नाटकचा हापूससदृश आंब्याला ८० ते १२० रुपये प्रतिकिलो, बदामी ६० ते ८०, तोतापुरी ५० व केसरला १४० ते १८० रुपये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. गुरुवारी कोकण व दक्षिणेतून तब्बल १०२७ टन आंब्याची आवक झाली असून, ६८,९५२ पेट्यांचा समावेश आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तापर्यंत एक लाख पेट्यांचा टप्पा पूर्ण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये गुरुवारी दिवसभरात ६५० वाहनांमधून सर्व प्रकारची २८११ टन फळांची आवक झाली. यामध्ये जवळपास अर्धी आवक फक्त आंब्याची आहे. कोकणातून ५५,१४७ व इतर राज्यांतून १३,८०५ पेट्यांचा समावेश आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडमधून हापूसची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. कर्नाटक, केरळ व आंध्र प्रदेशमधून कर्नाटकी हापूस, बदामी, तोतापुरी व केसर आंब्याची आवक सुरू झाली आहे. संपूर्ण मार्केट आंबामय झाले असून, आता जूनपर्यंत मार्केटवर आंब्याचे राज्य राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.      

 बाजार समितीमध्ये हापूस आंब्याला प्रतिडझन २०० ते ८०० रुपये डझन भाव मिळत आहे. कर्नाटकचा हापूससदृश आंब्याला ८० ते १२० रुपये प्रतिकिलो, बदामी ६० ते ८०, तोतापुरी ५० व केसरला १४० ते १८० रुपये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे. प्रत्येक वर्षी गुढीपाडव्यापासून आवक वाढण्यास सुरुवात होते. परंतु, यावर्षी होळीलाच आवक वाढली आहे. गुढीपाडव्यापर्यंत एक लाख पेट्यांचा टप्पा पूर्ण होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल

बाजार समितीमध्ये आंबा घेऊन येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र गेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. मध्यरात्रीपासून पहाटे सर्व आंब्याची वाहने मार्केटमध्ये घेऊन येण्याची व्यवस्था केली आहे. कलिंगड व टरबूजच्या वाहनांना दुपारी तीननंतर मार्केटमध्ये प्रवेश दिला जात असून, खाली झालेली वाहने तत्काळ मार्केटबाहेर काढण्यात येत आहेत.बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. कलिंगड व इतर फळांचा हंगामही सुरू आहे. फळांची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्यामुळे वाहतूक व व्यापार सुरळीत होण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.संगीता अढांगळे, उपसचिव फळ मार्केटबाजार समितीमधील फळांची आवकफळांचा प्रकार - आवक(टन)आंबा - १०२७कलिंगड - ६७१मोसंबी - १३५पपई २८१संत्री ११२खरबूज २९५अननस - २९अंजीर - २.६चिक्कू ४२डाळिंब ६८केळी ३७पेरू ३३ड्रॅगन फ्रुट - ३.५अवकडू ३किवी १.७