शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

प्रकल्पग्रस्तांच्या घरासह शहरविकासाचे प्रश्न मार्गी लावणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

By नामदेव मोरे | Updated: May 17, 2024 15:21 IST

विकासाच्या मुद्यांनाच निवडणुकीत प्राधान्य

नवी मुंबई : विकासाच्या मुद्यांवरच आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. प्रकल्पग्रस्तांसह शहरातील सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार आहोत. गरजेपोटी बांधलेली घरे, एफएसआय, दर्जेदार वाहतूक व्यवस्था, सक्षम आरोग्य यंत्रणेला प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

महायुतीचे ठाणे मतदार संघातील उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी नवी मुंबईमध्ये रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये कोपरखैरणे ते ऐरोली दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. विकासाचा अजेंडा घेवून आम्ही जनतेसमोर आलो आहोत. नवी मुंबईमधील भुमीपुत्रांची गरजेपोटी बांधलेली घरे, माथाडी कामगारांसह सर्व समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. नवी मुंबईकरांनाही दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल. जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न यापुर्वीही सोडविण्यात आले यापुढेही सर्व प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल. काही जण दिशाभुल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी सत्तेसाठी शिवसेनाप्रमुखांचे विचार साेडले. पण आपण शिवसेनाप्रमुखांचे विचार घेवून काम करत असून महायुतीचे सर्व घटकपक्ष निवडणुकीत परिश्रम करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या रॅलीमध्ये आमदार गणेश नाईक,  रविंद्र फाटक, माजी खासदार संजीव नाईक, संदीप नाईक, शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा, जिल्हा प्रमुख विजय चौगुले, संपर्क प्रमुख किशोर पाटकर, शिवराम पाटील, आमदार रमेश पाटील, ममीत चौगुले, यांच्यासह महायुतीच्या घटकपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.महायुतीचे नवी मुंबईकरांना आश्वासन.मानखुर्द नवी मुंबई व नवी मुंबई ते विमानतळापर्यंत मेट्रोचे जाळे तयार करणार.नवी मुंबई अंतर्गत मेट्रो मार्गीका तयार करण्यास प्राधान्य.वाशीतील पासपोर्ट कार्यालयाचे अधुनीकीकरण करणार.घणसोलीमध्ये क्रीडासंकूल उभारण्यास प्राधान्य.ठाणे बेलापूर औद्योगीक वसाहतीमध्ये रोजगाराभीमूख उद्योग आणण्यास प्राधान्य.नवी मुंबईमध्ये आयआयटी, आयआयएम सारख्या संस्था सुरू करण्यासाठी पाठपुरावा.एम्सच्या धर्तीवर दर्जेदार रूग्णालयाची उभारणी करण्यास प्राधान्य .गरजेपोटी बांधलेली घरे, एफएसआयसह नागरी प्रश्न सोडविण्यास प्राधान्य.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४thane-pcठाणे