शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मराठा समाज, माथाडींना न्याय देणार; धडाकेबाज कामगिरीची विरोधकांना धडकी - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 07:19 IST

आम्ही जबाबदारी पेलणारे आहोत, जबाबदारीपासून पळणारे नाही मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य.

नवी मुंबई : राज्यातील सरकार सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी, कामगारांचे आहे.  मराठा समाजासह माथाडी कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. मराठा आरक्षणासह सर्व समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल. आम्ही जबाबदारी पेलणारे आहोत, जबाबदारीपासून पळणारे नाही. सरकार धडाकेबाजपणे काम करत असून आमच्या धडाक्याने विरोधकांना धडकी भरली असल्याची टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त नवी मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. कामाचा धडाका पाहून विरोधकांना धडकी भरली आहे. राज्यात ७५ हजार नोकरभरती केली जाणार असल्याचेही सांगितले.    कामगार मंत्री सुरेश खाडे यांनीही कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदार गणेश नाईक, प्रवीण दरेकर, मंदा म्हात्रे, शिवेंद्रसिंहराजे भाेसले, निरंजन डावखरे, महेश शिंदे, संजीव नाईक, संदीप नाईक उपस्थित होते. 

पाटील यांना पुन्हा महामंडळ देणारमाथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी यापूर्वी अण्णासाहेब पाटील महामंडळाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्याकडे पुन्हा महामंडळाची धुरा दिली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

मागील सरकारमुळेच मराठा आरक्षण गेले मागील सरकारच्या काळात अडीच वर्षांत मराठा समाजावर अन्याय झाला. अशोक चव्हाण यांनी आरक्षण घालविले.  चव्हाण यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली असती तर परिस्थिती वेगळी दिसली असती. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे प्रश्नही सुटले नाहीत, असे मतही पाटील यांनी व्यक्त केले.

वसुली सम्राटांना जेलमध्ये टाकणार माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. माथाडींच्या नावाखाली काहीजण वसुलीचे काम करत आहेत.  अशा वसुली सम्राटांना जेलमध्ये टाकणार असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सरकार कामगारांच्या सोबत असून प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले. 

देशद्रोही कृत्य खपवून घेतले जाणार नाही : मुख्यमंत्रीपुणे येथे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याच्या घटनेविषयी एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. येथे देशद्रोही कृत्य खपवून घेतले जाणार नाहीत. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस