शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘फळांच्या राजा’चे राज्य सुरू;  १,२६७ टन आंब्याची आवक : ५५ हजार पेट्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 13:13 IST

बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी आंबा हंगामात जवळपास ५०० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. मार्च ते जूनदरम्यान बाजारपेठेवर आंब्याचे वर्चस्व असते. या वर्षीही १५ एप्रिलपासून आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे.

 

नामदेव मोरे -

नवी मुंबई :  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. शुक्रवारी तब्बल १२६७ टन आंब्याची आवक झाली असून त्यामध्ये ५५ हजार पेट्या व २५ हजार क्रेटचा समावेश आहे. आवक वाढल्यामुळे आंब्याचे दरही नियंत्रणात आले आहेत. बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी आंबा हंगामात जवळपास ५०० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. मार्च ते जूनदरम्यान बाजारपेठेवर आंब्याचे वर्चस्व असते. या वर्षीही १५ एप्रिलपासून आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून मोठ्या प्रमाणात हापूसची आवक सुरू आहे. कर्नाटकमधूनही आवक वाढली आहे. हापूसव्यतिरिक्त बदामी, लालबाग, तोतापुरी आंबाही विक्रीसाठी येत आहे. गेल्या आठवड्यात ५ ते ८ डझन वजनाच्या पेटीसाठी होलसेल मार्केटमध्ये २००० ते ५५०० रुपये दर मिळत होता. आता हेच दर १२०० ते ४००० वर आले आहेत. कर्नाटकचा आंबा गेल्या आठवड्यात २०० ते २२५ रुपये किलो दराने विकला जात होता. आता त्याचे दर ८० ते १२० रुपये  किलो झाले आहेत. इतर आंब्याचे दरही नियंत्रणात आले आहेत. दर नियंत्रणात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही आंब्याचा स्वाद घेता येणार आहे. पुढील दीड महिना आवक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :MangoआंबाMarketबाजार