शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील महाराष्ट्र भवनाचे मुख्यमंत्र्यांसमोर झाले अंतरिम सादरीकरण

By नारायण जाधव | Updated: February 6, 2024 16:45 IST

आज नवी मुंबईत महाराष्ट्र भवन व्हावे, या गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागणीला खऱ्या अर्थाने मूर्तस्वरूप प्राप्त झाले

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: आज नवी मुंबईत महाराष्ट्र भवन व्हावे, या  गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागणीला  खऱ्या अर्थाने मुहर्तस्वरूप प्राप्त झाले आहे. सोमवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठकीत नवी मुंबईमधील वाशी येथे उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवन प्रकल्पाचे  भव्यदिव्य वास्तूचे अंतरीम सादरीकरण करण्यात आले, अशी माहिती यासाठी पाठपुरावा करणाऱ्या आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली.

महाराष्ट्र भवनाची वास्तू कशी असेल ते मी आज प्रत्यक्ष पाहून माझ्या जीवनातला आनंद मावेनासा झाला आहे. महाराष्ट्र भवनाची वास्तू 14 मजली असून त्याचबरोबर अशा या सुंदर महाराष्ट्र भवनामध्ये अभ्यागतांसाठी स्वागत कक्ष, प्रतीक्षा कक्ष, भोजन कक्ष, प्रीफेशनल एरीया, बंक्वेट हॉल, सूट रूम, ज्यूस कॅफ, टी- कॅफ, कॉफी-कॅफ, बैठक कक्ष, ई-लायब्री, कॉनफरंन्स हॉल, फूड प्लाझा विश्रांती कक्ष, व्ही.आय.पी. रूम तसेच लोकप्रतिनिधीं सोबत येणारे त्यांचे सारथी, सहकारी, वाहन चालक किंवा कर्मचाऱ्यांकरिता ही विश्रांती रूम असणार आहेत. त्याचबरोबर अशा अनेक विविध प्रकारच्या सुसज्ज सुख-सुविधांची रेलचेल या महाराष्ट्र भवनामध्ये पहावयास मिळणार आहेत. तसेच महाराष्ट्र भवनाचे प्रथम दर्शनी भागामध्ये महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य बैठी पुतळा असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने भवनामध्ये प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराजाचे दर्शन घेऊन त्यानंतरच महाराष्ट्राची आठवण होणार असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

तसेच महाराष्ट्र भवनाचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी लागल्यामुळे अशी प्रथमच वास्तू महाराष्ट्रामध्ये उभी राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच सिडको व्यवस्थापकीय संचालक व अधिकारी वर्ग यांचे  म्हात्रे यांनी आभार मानले. नवी मुंबई शहर वसवितांना सिडको मार्फत वाशी येथे राज्यनिहाय भवन निर्मितीसाठी भूखंड उपलब्ध करून दिले गेले. राज्य निहाय दिल्या गेलेल्या सर्व राज्यांची भवने नवी मुंबई वाशी येथे उभी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, अशा विविध ठिकाणाहून नागरिक कामांसाठी विविध स्पर्धा परीक्षा व नोकर भरतीसाठी मुंबई येथे येत असतात. मात्र जागा नसल्याने व हॉटेलचा खर्च परवडत नसल्याने अनेक जण मिळेल तो आसरा शोधतांना दिसतात. ज्या महाराष्ट्र भवनासाठी सन 2014 पासून माझा जो लढा चालला होता त्याला आज पूर्णपणे पूर्णविराम लागला असून या महाराष्ट्र भवनाचा फायदा हा नवी मुंबईलाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्याला होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई