शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत भरणार पहिला फ्लेमिंगो महोत्सव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 06:40 IST

जागतिक स्थलांतरित पक्षी दिन :  १४ मेचा मुहूर्त, पर्यावरणप्रेमींचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : जागतिक स्थलांतरित पक्षी दिनानिमित्त नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींनी १४ मे रोजी शहरात फ्लेमिंगो महोत्सव भरविण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईतील अशा प्रकारचा हा पहिलाच महोत्सव असणार आहे.  विशेष म्हणजे, स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत महापालिकेने नवी मुंबई शहराला फ्लेमिंगो सिटीचा दर्जा देण्याचा सकारात्मक प्रयत्न केला आहे. त्या पार्श्वभूमीवर या महोत्सवाला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

जगभरातील स्थलांतरित पक्ष्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात जागतिक स्तरावर जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी मे आणि सप्टेंबर महिन्यात असे दोन वेळा जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस साजरा केला जातो. या अंतर्गत स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजनांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर ऊहापोह केला जातो. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण मोठे आहे. या परदेशी पाहुण्यांच्या स्थलांतराच्या जागा सुरक्षित कराव्यात, यासाठी पर्यावरणप्रेमींचा संघर्ष सुरू आहे. त्याला  मोठ्या प्रमाणात यशही प्राप्त झाले आहे. 

शहरातील स्थलांतरित पक्ष्यांचे लक्षणीय प्रमाण लक्षात घेऊन, नवी मुंबई महापालिकेनेही सकारात्मक पुढाकार घेतला आहे.  विशेष म्हणजे, या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नवी मुंबईला प्लेमिंगो सिटीचा दर्जा दिला आहे. त्यानुसार, शहरात ठिकठिकाणी फ्लेमिंगोंचे आकर्षक शिल्प उभारले आहेत. पालिकेच्या या प्रयासाला बळ देण्याच्या हेतूने  आता नवी मुंबईत पहिला  फ्लेमिंगो महोत्सव भरविणार आहे. 

कार्यक्रमांची रेलचेलया महोत्सवाच्या माध्यमातून जैवविविधतेच्या दृष्टीने पाणथळ आणि दलदलीच्या प्रदेशांचे संवर्धन करण्याची गरज अधोरेखित होणार असल्याचे  खारघर वेटलँड अँड हिल्स फोरमच्या ज्योती नाडकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. या महोत्सवात  छायाचित्र प्रदर्शन, कांदळवन आणि पाणथळीवर आधारित शैक्षणिक दिखावे, फ्लेमिंगो नृत्य आणि कला कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली, तर हा महोत्सव केवळ पक्षीप्रेमींसाठी नसून धोक्यात असलेले त्यांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी आयोजित उपक्रमांचा  एक भाग असल्याचे नॅटकनेक्टचे संचालक बी.एन. कुमार यांनी म्हटले आहे.

यांचे आहे सहकार्यजागतिक स्थलांतरित पक्षी दिवस अर्थात, डब्ल्यूबीएमडी ग्लोबल इव्हेंटने सूचित केल्यानुसार, या महोत्सवाची रूपरेषा निश्चित केली आहे. त्यानुसार, नेरुळ येथील डीपीएस सरोवर येथे हा महोत्सव होणार आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. १३९ वर्षांपासून निसर्ग संशोधनात कार्यरत असलेली बीएनएचएस, नवी मुंबई महापालिका, महाराष्ट्र मँग्रोव्ह फाउंडेशन, गोदरेज मँग्रोव्ह फाउंडेशन, बाह्यउपक्रम संघटना वँडरिंग सोल्स, निकॉन आणि दिल्ली पब्लिक स्कूल आदींच्या सहकार्यातून हा महोत्सव होणार आहे.