शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

‘एनएमपीएल’चे पाचवे पर्व मात्तबर १६ संघ गाजवणार

By कमलाकर कांबळे | Updated: December 13, 2023 20:25 IST

खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पूर्ण, क्रिकेट सामन्यांचा १७ जानेवारीपासून थरार.

नवी मुंबई : नवी मुंबई प्रीमियर लीग अर्थात एनएमपीएलच्या पाचव्या पर्वासाठी बुधवारी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या लिलाव प्रक्रियेत नवी मुंबईतील २४० क्रिकेट खेळाडूंनी सहभाग घेतला असून, मातब्बर १६ संघांत १७ जानेवारीपासून क्रिकेटचा थरार अनुभवयास मिळणार आहे.

नवी मुंबईतील स्थानिक टेनिस बॉल क्रिकेटपटूंना त्यांची गुणवत्ता प्रदर्शित करण्यासाठी एक भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या सहकार्याने नवी मुंबई प्रीमियर लीगची सुरुवात करण्यात आली. कोपरखैरणे येथील भूमिपुत्र मैदानावर या स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत. माजी नगरसेवक लीलाधर नाईक, एनएमपीएल कमिशनर दीपक पाटील, स्वप्निल नाईक, ओमकार नाईक, नीलेश पाटील, प्रतीक पाटील, विकी भोईर, भूषण पाटील, समालोचक कुणाल दाते आदी यावेळी उपस्थित होते.

नवी मुंबई रत्न पुरस्काराने सन्मानदरम्यान, यावेळी अध्यात्माची परंपरा समर्थपणे पुढे नेणारे भजन सम्राट महादेव बुवा शाबाजकर, आयपीएल गाजवणारा नवी मुंबईचा क्रिकेटपटू अमन खान, टेनिस बॉल स्टार क्रिकेटपटू भूषण पाटील आणि संस्कृती आणि परंपरा जपणारे दिवाळे ग्रामस्थ बहिरी देव मंडळ यांचा नाईक यांच्या हस्ते नवी मुंबई रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

हेल्दी नवी मुंबई फिट नवी मुंबईएनएमपीएल स्पर्धेच्या माध्यमातून या वर्षी ‘हेल्दी नवी मुंबई, फिट नवी मुंबई’ ही संकल्पना राबविली जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास आणि अन्य विविध कारणांमुळे आलेले नैराश्य दूर करण्यासाठी मुलांबरोबरचा संवाद वाढला पाहिजे. त्यासाठी मुलांपेक्षा पालकांचे समुपदेशन गरजेचे आहे. खेळाच्या माध्यमातून याबाबतची जनजागृती उत्तम प्रकारे होऊ शकते. त्यानुसार येत्या काळात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी या वेळी दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई