शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

तारापूर अणुप्रकल्पावर होणाऱ्या परिणामांचा अहवालच ठरविणार वाढवण बंदराचे भवितव्य

By नारायण जाधव | Updated: January 9, 2024 17:11 IST

भरावासाठीचा कच्चा माल कोणत्या मार्गाने येणार : ‘सीआरझेड’ प्राधिकरणाने मागविलेली माहिती

नवी मुंबई : महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या बंदर विकासात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या येथील जेएनपीटी बंदराच्या सहकार्यातून बांधण्यात येणाऱ्या पालघर येथील नियोजित वाढवण बंदरापुढील अडचणी संपताना दिसत नाही. या बंदराचा प्रस्ताव मान्यतेसाठी गेला असता ‘सीआरझेड’ प्राधिकरणाने त्यावर निर्णय न घेता तारापूर अणुप्रकल्पावर नियोजित वाढवण बंदरावर कोणते बरेवाईट परिणाम होतील, याचा अहवाल सादर करण्यास जेएनपीटीस सांगितले आहे.

महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरण अर्थात एमसीझेडएमएने सर्वांग चर्चा करून या माहितीसह प्रस्तावित बंदरासाठी जो भराव करण्यात येणार आहे, त्यासह इमारती, जेट्टी, रस्ते आणि रेल्वेमार्गांच्या बांधकामासाठी लागणारा कच्चा माल कोठून व कोणत्या मार्गाने आणणार असे प्रश्न करून त्याची सविस्तर माहिती सादर करण्यास सांगितले आहे. याशिवाय पालघर जिल्ह्यातील रहिवाशांनी कोणत्या हरकती व सूचना केल्या याचा तपशील मागून तोपर्यंत या बंदरास आपले ना-हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत निर्णय पुढे ढकलला आहे.

८७६३.२ एकरपैकी ३३२१४.३७ एकरांचा समुद्रात भरावप्रस्तावित वाढवण बंदर भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. वाढवण पोर्ट लिमिटेड आणि जेएनपीटी व महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड यांच्या ७४ टक्के व २६ भागिदारीतून ते बांधण्यात येत आहे. यासाठी १०.१४ किलोमीटर अर्थात ८७६३.२ एकर सीआरझेड क्षेत्रात बांधण्यात येणार आहे. यात ३३२१४.३७ एकराचा समुद्रात भराव करण्यात येणार आहे.

रस्ते-रेल्वेने जोडणारबंदरात कंटेनद्वारे आलेल्या मालाची रस्ते आणि रेल्वेद्वारे देशभर वाहतूक करण्यात येणार आहे. त्यासाठी ३४०३३.३२ चौरस मीटर लांबीच्या रस्ते आणि २१६०३५.४५ लांबीच्या रेल्वेरुळांद्वारे ते बंदरापासून मुख्य रस्ते आणि रेल्वेलाइन जोडण्यात येणार आहे.

दमण येथून आणणार रेतीप्रस्तावित वाढवण बंदरासाठी जमीन तयार करण्यासाठी ड्रेजिंग करून २०० दशलक्ष क्युबिक मीटर वाळू काढण्यात येणार आहे. चांगल्या प्रतीची वाळू मिळविण्यासाठी अरबी समुद्रात सुमारे ६० किलोमीटर अंतरावर आणि दमण किनाऱ्यापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर सॅण्ड बॉरो पीट (साठा) येथे रेतीचा शोधला असल्याची माहिती जेएनपीएने नुकतीच दिली आहे.