शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कळवा-ऐरोली उन्नत मार्गाच्या भूसंपादनाचा पाळणा हलला; कल्याण-कर्जत-कसाराच्या प्रवाशांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 09:12 IST

मध्य रेल्वेचे निर्माण विभागाचे मुख्य प्रशासन अधिकारी विवेक कुमार गुप्ता यांनी दिवाळीच्या मुहुर्तावर ही भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे.

- नारायण जाधवनवी मुंबई : साडेसहा लाख प्रवाशांची ये-जा असलेल्या मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकातील गर्दीच्या विभाजनासाठी कळवा-मुंब्रा स्थानकातील लोकलवरील गर्दीचा भार कमी करून नवी मुंबईतील प्रवाशांना थेट कळवा-दिघामार्गे ऐरोलीकडे येण्यासाठी प्रस्तावित केलेल्या उन्नत दुपदरी रेल्वे मार्गासाठी आवश्यक भूसंपादनाला शासनाने पुन्हा गती दिली आहे. यानुसार मध्य रेल्वेने या मार्गासाठी आवश्यक असलेल्या एकूण जमिनीपैकी मफतलाल कंपनीच्या मालकीसह शासनाच्या मालकीच्या ५६९१.२४ चौरस मीटर जमिनीची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. यात शासनाच्या मालकीची जमीन अवघी ४७९.१३ चौरस आहे.

मध्य रेल्वेचे निर्माण विभागाचे मुख्य प्रशासन अधिकारी विवेक कुमार गुप्ता यांनी दिवाळीच्या मुहुर्तावर ही भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. हे भूसंपादन रखडल्याने प्रकल्पाचा खर्च दीडशे कोटींहून अधिक रकमेने वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१६ मध्य या मार्गाचे भूमिपूजन झाले होते. मात्र, तरीही भूसंपादनाअभावी त्याचे काम रखडले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने एमयूटीपी-३ मध्ये जाहीर केलेल्या विविध प्रकल्पांत बहुचर्चित कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्पाचा समावेश आहे. याचे ९५ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. प्रकल्पात आवश्यक ३.६५ पैकी ३.५ हेक्टर जागा एमआरव्हीसीच्या ताब्यात आहे. उर्वरित जागा ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील बंद पडलेल्या मफतलाल कंपनीच्या ताब्यात आहे.

सिडकोनेही दिली १२६१.६५ चौ. मी. जागाकळवा-ऐरोली उन्नत मार्गात सिडकोच्या मालकीची १२६१.६५ चौ. मी. जागा जात आहे. ती सिडकोने नुकतीच मुंबई रेल्वे विकास महामंडळाला हस्तांतरित केली आहे. आता कालौघात या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या दिघा रेल्वे स्थानकाचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. 

प्रकल्पाचे फायदेहा प्रकल्प पूर्णत्वास आल्यास मध्य रेल्वेच्या मार्गावर कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, बदलापूर अशा कर्जत आणि कसारा मार्गावरील स्थानकांतून ठाणे स्थानकात न जाता, थेट नवी मुंबईतील पनवेल, बेलापूर, नेरूळ आणि वाशी स्थानकांत जाता येईल. यामुळे दैनंदिन साडेसहा लाखांहून अधिक प्रवाशांची ये-जा असलेल्या ठाणे स्थानकावरील मोठा भार कमी होण्यास मदत होईल.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई