शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

एमयूटीपीच्या रेल्वे प्रकल्पावरचा खर्चाचा डोंगर अखेर घटला; खर्च ५४,७७७ कोटींवरून ३३,६९० कोटींपर्यंत झाला कमी

By नारायण जाधव | Updated: April 13, 2023 07:01 IST

‘एमयुटीपी-३ अ’अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या ५४,७७७ कोटींच्या प्रकल्पांना २०१८ मध्ये मान्यता दिली होती.

नवी मुंबई :

‘एमयुटीपी-३ अ’अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या ५४,७७७ कोटींच्या प्रकल्पांना २०१८ मध्ये मान्यता दिली होती. मात्र, यातून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने पनवेल-सीएसएमटी या १२,३३१ कोटींच्या उन्नत मार्गासह ७,१८४ कोटींचा पनवेल-वसई उपनगरीय मार्ग आणि २१० ऐवजी १९१ रेल्वेगाड्या खरेदीस मान्यता दिली. यामुळे खर्चात ५४,७७७ कोटींवरून ३३,६९० कोटी इतकी घट झाली आहे. यामुळे राज्य शासनाने आता सुधारित आदेश काढून यातील सिडकोचा भार ८४४ कोटी २३ लाख आणि  नवी मुंबई महापालिकेचा २८१ कोटी ४१ लाख असा ११२५ कोटी ६४ लाख रुपयांनी कमी केला आहे.सिडको आणि नवी मुंबई महापालिकेसह राज्य शासन, ‘एमएमआरडीए’ व मुंबई पालिकेचाही भार कमी केला आहे. यानुसार नगरविकास विभागाने ११ एप्रिल २०२३ रोजी नवा शासननिर्णय जारी केला.

३३,६९० कोटींच्या या प्रकल्पात राज्य शासनाचा हिस्सा ५० टक्के इतका राहणार आहे. आपल्यावरील काही भार राज्य शासनाने हे मार्ग ज्या महापालिकांच्या क्षेत्रातून जात आहेत, त्यांच्यावरही  काही भार टाकला होता. यात राज्य शासन १२५६७ कोटी,  एमएमआरडीए ३६३५ कोटी ३० लाख, सिडको १७९४.३० कोटी, मुंबई महापालिका १७९४.३० कोटी आणि नवी मुंबई महापालिका ५९८ कोटी १० लाख असा भार टाकला होता; परंतु आता तीन प्रकल्प वगळल्याने ‘एमयुटीपी-३ अ’च्या खर्चात घट झाली आहे. यात राज्य शासनाला आपल्या हिश्श्याचा १६८४५ कोटींचा भार उचलावा लागणार आहे. यातील ३५०० कोटींचे कर्ज राज्य शासन घेणार  आहे.

असा राहणार नव्याने दिलेला भारआता नव्या आदेशानुसार १३३४५ कोटींची विभागणी पुढीलप्रमाणे९३८५.६२ कोटी राज्य शासन ही रक्कम दोन टप्प्यांत या प्राधिकरणांनी द्यायची आहे.

१७४२.५५ कोटी एमएमआरडीए९५० कोटी मुंबई महापालिका९५० कोटी सिडको३१६.६९ कोटी नवी मुंबई महापालिका

पनेवल-वसई महापालिकेवरही भारसध्या यातून पनवेल आणि वसई-विरार या दोन महापालिकांना वगळले असले, तरी नजीकच्या भविष्यात पनवेल आणि वसई-विरारसह अन्य महापालिकांची आर्थिक परिस्थिती पाहून त्यांच्याकडून आर्थिक साहाय्य घेण्यास रेल्वे विकास महामंडळास परवानगी दिली आहे.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल