शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

घुसखोर, स्थानबद्ध विदेशींचा सांभाळ करण्याची कटकट होणार दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 06:36 IST

मुंबई, नवी मुंबईत होणार स्थानबद्धता केंद्र, ५७ कोटींचा खर्च

- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : व्हिसाची मुदत संपुष्टात येऊनही, तसेच विविध गुन्ह्यांत कारागृहातून मुक्त झालेल्या विदेशी नागरिकांना आता नवी मुंबईत  येथे कायमस्वरूपी, तर मुंबईतील मध्यवर्ती कारागृहात तात्पुरते स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

सद्य:स्थितीत राज्यात असे केंद्र उपलब्ध नसल्याने स्थानबद्ध करण्यात येणाऱ्या विदेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत पाठविण्यात अडचणी निर्माण होत आहेत, तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होत आहे. सद्य:स्थितीत राज्यात कोठेही अशा परदेशी नागरिकांना स्थानबद्ध करण्यासाठी सुयाेग्य सोय वा केेंद्र नाही. यामुळे विविध प्रकारांतील परदेशी नागरिकांना स्थानबद्ध करताना अनेक अडचणी निर्माण होऊन त्या त्या देशांशी असलेल्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर विपरीत  परिणाम होतो. यामुळे देशाच्या प्रतिमेलाही तडा जाण्याची भीती असते.

सामाजिक न्याय विभागाकडे संचालनमुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही ठिकाणच्या स्थानबद्धता केंद्रांचे संचालन सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी २६९ पदांची निर्मिती करण्यास मान्यता दिली आहे. यात तात्पुरत्या केंद्रासाठी ६५ कर्मचाऱ्यांकरिता २.६४ कोटी, तर कायमस्वरूपी केंद्रासाठीच्या २०४ कर्मचाऱ्यांसाठी ८.४४ कोटींच्या खर्चासही मंजुरी दिली आहे.

मुंबईत ८०, नवी मुंबईत २१३ विदेशींची सोयविदेशी नागरिकांना स्थानबद्ध करण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन उशिरा का होईना, आता मुंबईच्या भोईवाडा मध्यवर्ती  कारागृहात ८० विदेशी नागरिकांना स्थानबद्ध करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातील, तर राज्य राखीव पोलिस बल, गट क्रमांक ११, बाळेगाव, नवी मुंबई येथे २१३ विदेशी नागरिकांना स्थानबद्ध करण्यासाठी कायमस्वरूपी स्थानबद्धता केंद्र सुरू करण्यास गृहविभागाने मान्यता दिली आहे.

कायमस्वरूपी केंद्राची इमारत ४६ कोटींचीकायमस्वरूपी स्थानबद्धता केंद्राच्या इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडून करावयाचे असून, त्यासाठी ४६ कोटी खर्च येणार आहे.

कोणत्या विदेशी नागरिकांना करणार स्थानबद्धव्हिसा मुदत संपुष्टात आलेले विदेशी नागरिक, कारागृहातूून शिक्षा भोगून मुक्त झालेले विदेशी नागरिक, तसेच विविध कारणांस्तव  मायदेशी परत न गेलेल्या विदेशी नागविकांसह पारपत्राविना देशात घुसखोर केलेल्या विदेशींना स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

विदेशींचा सांभाळ करताना येणाऱ्या अडचणीजगातील प्रत्येक देशाची भाषा, धर्म, रीतिरिवाज, पोशाख, अन्न वेगवेगळे आहे. यामुळे विदेशींना अटक केल्यावर किंवा त्यांना काही  कारणास्तव स्थानबद्ध करायचे झाल्यास सर्वांत आधी अडचण येते ती भाषेची. शिवाय धार्मिक रीतिरिवाज, पोशाख, अन्नधान्य पुरविताना मोठ्या अडचणी निर्माण होतात. अशा वेळी त्या-त्या देशांच्या दूतावासाशी संपर्क साधून या स्थानबद्ध केलेल्या विदेशी  नागरिकांशी संपर्क सोडविणे, त्यांच्या अडचणी सोडविणे, तसेच त्यांना त्यांच्या मायदेशी पाठविणे या स्थानबद्धता केंद्रामुळे सोपे होणार आहे. यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा जपण्यासही मदत होणार आहे.

टॅग्स :jailतुरुंग