शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनाला मिळणार गती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 09:11 IST

शासनाने स्थापन केली समिती : इतिहास अभ्यासकांचा समावेश

नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाने राज्यस्तरीय समितीसह पाच विभागीय समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांवर इतिहास अभ्यासकांसह गडसंवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींची नियुक्ती केली आहे. सर्व किल्ल्यांचा संवर्धनविषयक आराखडा तयार करण्यापासून प्रत्यक्ष संवर्धनासाठीचे अहवाल व जनजागृतीचे काम ही समिती करणार आहे. 

गड, किल्ले हे राज्यांचे ऐतिहासिक वैभव आहे. परंतु, अनेक किल्ल्यांची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेल्या किल्ल्यांनाही  समस्यांचा विळखा आहे. अनेक सामाजिक संस्थांनी किल्ल्यांवर  संवर्धनाचे काम सुरू केले आहे, परंतु, या प्रयत्नांना शासनाकडून पाठबळ मिळत नव्हते. शासनाने यापूर्वी संवर्धन समित्या स्थापन केल्या होत्या. परंतु, जानेवारी २०२० मध्ये या समित्यांवरील सदस्यांच्या नेमणुका रद्द केल्या होत्या. नवीन समिती स्थापन करण्याची मागणी दुर्गप्रेमींकडून केली जात होती. तिची दखल घेऊन ३० नाेव्हेंबरला  ३६ सदस्यांची नवीन समिती स्थापन केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. राज्यस्तरीय समितीवर १४ सदस्य असणार आहेत. कोकण, पुणे, नागपूर, नाशिक व औरंगाबाद, नांदेड विभागासाठी पाच विभागीय समित्या स्थापन केल्या असून, त्यावर ४ ते ५ सदस्यांची नियुक्ती केली आहे. शासनाच्या या निर्णयाचे दुर्गप्रेमींनी स्वागत केले आहे. राज्य व विभागीय समित्यांमुळे दुर्गसंवर्धनाच्या कामाला गती येईल, असे मत व्यक्त केले आहे. 

गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी समिती स्थापन केल्याबद्दल शासनाचे आभार. या समितीमुळे गड, संवर्धनाच्या कामाला गती येईल. पुणे विभागीय समितीवर नियुक्ती केली असून, संवर्धनासाठी सकारात्मक योगदान देण्याचा प्रयत्न केला जाईल. - संतोष हसूूरकर, संस्थापक दुर्गवीर प्रतिष्ठान

राज्यस्तरीय समितीची भूमिका

n विभागस्तरीय समितीच्या शिफारशीप्रमाणे राज्यातील असंरक्षित गड, किल्ल्यांची जिल्हानिहाय माहिती तयार करणे. n गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कोणकोणते जनजागृतीपण उपक्रम राबविता येतील, त्याचा आराखडा तयार करणे. n संवर्धनासाठी स्थानिक नागरिक, संस्था, विद्यार्थी, युवक, बचत गट यांना सहभागी करण्याचा आराखडा तयार करणे.n दुर्गसंवर्धनासाठी दत्तक योजना तयार करणे व गडावरील नियमित स्वच्छता मोहिमांसाठीचा आराखडा तयार करणे. n गड किल्ल्यांवर संस्था व उद्योगांच्या मदतीने नकाशे, माहितीफलक लावण्याचा आराखडा तयार करणे.

विभागीय समितीची जबाबदारी 

n विभागातील गडकिल्ल्यांची सर्वंकश माहिती गोळा करणे, जिल्हानिहाय किल्ले, गॅझेटिअर्स तयार करण्यासाठी मदत करणे. n किल्लानिहाय दुरुस्तीची शासनाला शिफारस करणे.n गडसंवर्धन करताना किल्ल्याचे पावित्र्य राखून पुरातत्वीय नियमानुसार कोणत्या सुविधा देता येतील याविषयी शिफारस करणे. n पर्यटन विकासासाठीचा  व स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीचा आराखडा तयार करणे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईFortगडEknath Shindeएकनाथ शिंदे