शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारदारालाच पोलिस ठाण्यात जबर मारहाण; सहायक निरीक्षकावर गुन्हा दाखल

By सूर्यकांत वाघमारे | Updated: January 20, 2023 08:44 IST

एक प्रकरणात आयुक्तांकडे तक्रार केल्याचा राग

नवी मुंबई : मारहाण प्रकरणात चायनीस चालकाला पाठीशी घालत जखमी तरुणालाच पोलिस ठाण्यात जबर मारहाण केल्याप्रकरणी सहायक निरीक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे. कळंबोली पोलिस ठाण्यात हा प्रकार घडला आहे. मात्र तरुणाचा जबाब नोंदवून देखील अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला जात नव्हता. अखेर संबंधितांनी सह आयुक्तांची भेट घेऊन घडलेल्या घटनेची माहिती दिली असता गुरुवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला. 

कळंबोली येथे राहणाऱ्या विकास उजगरे याच्यासोबत 6 जानेवारीला हा प्रकार घडला आहे. तो त्याच्या मित्रांसोबत चायनीस सेंटरवर गेला होता. त्याठिकाणी एका मित्राचा वेटरसोबत वाद होऊन भांडण झाले होते. त्यांनतर सर्वजण तिथून निघून गेले असता, एका मित्राची राहिलेली बॅग घेण्यासाठी विकास पून्हा चायनीस सेंटरवर गेला होता. यावेळी तिथे त्याला चायनीस सेंटर चालक व इतर कर्मचाऱ्यांनी जबर मारहाण केली. त्यामुळे विकास याने पोलिसांच्या कंट्रोलवर फोन करून मदत मागितली होती. यानंतर तिथे आलेल्या पोलिसांनी चायनीस सेंटरवरील दोन कामगार व विकास यांना कळंबोली पोलिस ठाण्यात नेले होते. मात्र त्याठिकाणी उपस्थित सहायक निरीक्षक दिनेश पाटील यांनी विकास यालाच मारहाण व जातीवाचक शिवीगाळ करत शौचालयाबाहेर उभे केले.

शिवाय ज्यांनी मारहाण केली त्यांचीच विकास विरोधात तक्रार घेऊन पाठवून दिले. दरम्यान विकास याला झालेल्या मारहाणीमुळे त्याच्या पोटात दुखू लागले असता त्याने रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती केली. यानंतरही रात्रभर त्याला पोलिस ठाण्यातच ठेवून दिनेश पाटील मारहाण करत राहिले. अखेर पहाटेच्या सुमारास एका अधिकाऱ्याने दिनेश हा एका उपायुक्तांच्या नातेवाईक लागतो असे सांगितल्यानंतर पोलिसांच्या गाडीतून त्याला रुग्णालयाबाहेर सोडून देण्यात आले.

चायनीस सेंटरवर व त्यानंतर पोलिस ठाण्यात झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने विकासावर तीन दिवस रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान त्याची कोणाविरोधात तक्रार नसल्याच्या अर्जावर देखील बळजबरीने सही घेण्यात आली होती. अखेर रुग्णालयातून सुटल्यानंतर त्याने घडलेल्या घटनेची तक्रार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार सहायक आयुक्तांनी त्याचा जबाब देखील घेतला होता. मात्र सहायक निरीक्षक दिनेश पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात चालढकल केली जात होती.

अखेर तक्रारदार यांनी गुरुवारी ऍड स्वप्नील जगताप, ऍड सिद्धार्थ इंगळे, ऍड अक्षय गवळी, ऍड हेमंत शिंदे यांच्यासह थेट पोलिस आयुक्तालय गाठले. त्याठिकाणी सह आयुक्त संजय मोहिते यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची तक्रार केली. त्यानंतर गुरुवारी रात्री दिनेश पाटील विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न व ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास याने यापूर्वी एका प्रकरणात कळंबोली पोलिसांची आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्याच्या रागातून दिनेश पाटील यांनी चायनीस चालकाला पाठीशी घालत दिनेश यालाच अमानुष मारहाण केल्याचे समजते.

टॅग्स :PoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई