शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत बंद पडलेले 'आपले सरकार सेवा केंद्र' लवकरच होणार सुरू

By कमलाकर कांबळे | Updated: August 18, 2023 18:20 IST

कोकण विभागीय आयुक्तांच्या संबंधित विभागाला सूचना 

नवी मुंबई:  ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बंद असलेली ‘आपले सरकार सेवा केंद्र’ तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करावे तसेच इतर सर्व योजनांच्या प्रगतीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्ष रहावे, अशा सूचना कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी  दिल्या आहेत.

कोकण भवनातील पहिल्या मजल्यावरील आयुक्त कार्यालयाच्या बैठक कक्षात डॉ. कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागातील जिल्हा परिषदांच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती पुजार, सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर  उपस्थित होते.

बैठकीत माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत भूमी, जल, वायु, अग्नी आणि आकाश या संकल्पनेवर करावयाच्या कामांचा आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी आढावा घेऊन मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजना, जल जिवन मिशन, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, स्वच्छ भारत अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला व बाल विकास विभागाच्या योजना, ग्रामपंचायत विभागाकडील योजना, समाजकल्याण विभागाकडील योजना इ. योजनांचा आयुक्तांनी आढावा घेतला. 

यावेळी सर्व जिल्हयांमार्फत आपल्या कार्यक्षेत्रात माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत  जुन व जुलै, २०२३ दरम्यान केलेली कामे तसेच ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये करावयाच्या कामांबाबत सादरीकरण करण्यात आले. घरकूल योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी जमिन उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडया व शाळा यांना भेटी देऊन क्षेत्रिय कामकाजाचा आढावा घेण्याबाबत निर्देश यावेळी देण्यात आले.