शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

फोन आला अन् अपघात झाला; बस थांब्यावर उभ्या असलेल्या तरुणाला ट्रकची धडक, मृत्यू

By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 14, 2023 19:45 IST

सायन पनवेल मार्गावर सानपाडा जंक्शनवर हा अपघात घडला आहे.

नवी मुंबई : टॅक्सीत बसून जात असतानाच फोन आल्याने बस थांब्यावर उभे राहून फोनवर बोलणाऱ्या तरुणाला ट्रकने धडक दिल्याने त्याच्या मृत्यूची घटना घडली आहे. मामाच्या मुलाची हळद उरकून घरी जाणाऱ्या तरुणासोबत हा अपघात झाला. यामध्ये दोन वाहनांचे देखील नुकसान झाले असून पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. सायन पनवेल मार्गावर सानपाडा जंक्शनवर हा अपघात घडला आहे.

सायन येथे राहणारा प्रशांत पाटील त्याच्या मामाच्या मुलाच्या हळदीसाठी मित्र आकाश महाडिक याच्यासोबत पनवेलच्या नावडे येथे आला होता. बुधवारी रात्री हळदीचा कार्यक्रम उरकल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास दोघेही परत सायनला चालले होते. रात्री दिडच्या सुमारास गाड्या बदलत ते सानपाडा जंक्शन याठिकाणी पोचले असता, तिथून सायनला जाणाऱ्या गाडीच्या शोधात होते. त्याचवेळी एका टॅक्सी चालकाने त्यांना वाशीपर्यंत सोडतो असे सांगितले. त्यानुसार दोघेही टॅक्सीत बसत असतानाच प्रशांतला कोणाचातरी फोन आला. यामुळे तो पुन्हा टॅक्सीबाहेर येऊन बाजूच्याच बस थांब्याजवळ उभा राहून फोनवर बोलत होता.

त्याचवेळी मुंबईकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने प्रशांतला जोराची धडक देऊन त्याठिकाणी उभ्या असलेल्या दोन रिक्षांनाही ठोकर मारली. यामध्ये प्रशांत गंभीर जखमी झाला असता रिक्षातून त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार दरम्यान गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालक फजल मुल्ला याच्या विरोधात सानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAccidentअपघात