शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभागाचे वरातीमागून घोडे; दाेन आठवड्यांत अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 07:27 IST

अर्धा पावसाळा संपल्यानंतर ॲपसाठी समिती स्थापन

- नारायण जाधव

नवी मुंबई : मुुंबई उच्च न्यायालयाने खड्ड्यांवरून महामुंबईतील सर्व महापालिका आयुक्तांना न्यायालयात हजर राहण्यास सांगून धारेवर धरले होते. मात्र, खड्ड्यांना सार्वजनिक  बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील एमएसआरडीसीही तितकीच जबाबदार आहे. त्यामुळे न्यायालयाने महापालिका  आयुक्तांना खडे बोल सुनावल्यानंतर जाग आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आता अर्धाअधिक पावसाळा संपल्यानंतर वरातीमागून घोडे हाकून राज्य मार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवरील खड्ड्यांच्या तक्रारी ऐकून ते बुजविण्यासाठी ॲप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ॲप कसे असावे, त्याची अंमलबजावणी कशी करावी, ॲप विकसित करण्यासाठी आवश्यक ते हार्डवेअर आणि साॅफ्टवेअर  करण्यासाठी सल्लागाराची निवड करण्यासाठी बुधवारी एक उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, रस्ते व बांधकाम विभागाच्या सचिवांसह कोकण विभागाचे मुख्य अभियंता यांचा समावेश आहे. या समितीने सर्व अभ्यास करून दाेन आठवड्यांत अहवाल सादर करावा, असे सांगण्यात आले आहे. ॲपसह त्यात आणखी काय नवीन हवे, कोणते बदल हवेत, याचे अधिकार या समितीला दिले आहेत. त्यानंतर या समितीच्या अहवालानंतर हे ॲप विकसित करण्यात येणार आहे.

मुंबई - गोवा महामार्गाचे  अजूनही भिजत घोंगडे गणेशोत्सवापूर्वी मुंबई - गोवा महामार्गाची दुरुस्ती होईल, त्याच्या एका लेनचे काँक्रिटीकरण होईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र  चव्हाण यांनी आपल्या पाचव्या पाहणी दौऱ्यात सांंगितले होते. मात्र, कामाची प्रगती पाहता १९ सप्टेंबरपूर्वी हे होणे अशक्य दिसत आहे.

यंदा ॲपचा लाभ नाहीचखड्ड्यांबाबतच्या तक्रारी ऐकून ते बुजविण्यासाठी जे ॲप तयार करण्यात येणार आहे, त्यासाठीच्या समितीला दोन आठवड्यांची मुदत  दिली आहे. म्हणजे सप्टेंबर संपताना हा अहवाल येईल. त्यानंतर हे ॲप तयार होणार आहे. म्हणजे यंदाचा पावसाळा संपल्यानंतर ते कदाचित लॉन्च होईल. यामुळे यंदा त्याचा लाभ तक्रारदारांना घेता येणार नाही. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकNavi Mumbaiनवी मुंबई