शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

मोरा बंदरात बोट रुतली चिखलात! प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा भाविकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 14:06 IST

महाशिवरात्रीनिमित्ताने बेटावर ये-जा करणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बंदर, पोलिस, शासकीय, निमशासकीय सुरक्षा यंत्रणा मोठ्या संख्येने तैनात करण्यात आली होती.

उरण :  महाशिवरात्रीनिमित्ताने घारापुरी बेटावर ये-जा करणाऱ्या हजारो शिवभक्तांना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे. शुक्रवारी दुपारी ४ नंतर तर काही बोटी उरण-मोरा बंदरातच चिखलात रुतून बसल्यामुळे आणि ठरवून दिलेल्या एकेरी ६५ रुपये तिकिटाऐवजी बोट चालकांकडून ७०-८० रुपये वसूल केल्याने घारापुरी बेटावर येणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागला. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र शिवभक्तांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

महाशिवरात्रीनिमित्ताने बेटावर ये-जा करणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बंदर, पोलिस, शासकीय, निमशासकीय सुरक्षा यंत्रणा मोठ्या संख्येने तैनात करण्यात आली होती. राजबंदर जेट्टीवर दुपारी ४ नंतर प्रशासनाचे नियोजन ढासळल्याने जेएनपीए व उरण-मोराकडे निघालेल्या भाविकांना एका बोटीवरून दुसऱ्या बोटीवर जाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. 

मनमानीपणे तिकिटाची आकारणी-  ग्रामपंचायतीच्या पत्रानंतर महाशिवरात्रीला बेटावर येणाऱ्या भाविकांसाठी बंदर विभागाकडून या वर्षीही सुमारे ३०० ते ५०० प्रवासी वाहतूक क्षमतेच्या सहा मच्छीमार बोटींची व्यवस्था केली होती.-   यासाठी बंदर विभागाने एकेरीसाठी ६५ तर दुहेरी परतीच्या प्रवासासाठी १३० असा तिकीट दर ठरवून दिला होता. मात्र तिकीट दर ठरवून दिल्यानंतरही बोटचालकांकडून एकेरीसाठी ७०-८० रुपये तर परतीच्या प्रवासासाठी १४०-१६० रुपयांपर्यंत  मनमानीपणे तिकीट दर आकारणी करीत होते, याचाही भाविकांना भुर्दंड पडला.

-   बोटीत अडकून पडलेल्या महिला, आबालवृद्धांचे अतोनात हाल झाले. हा गोंधळ संपतो ना संपतो तोपर्यंत समुद्रातील ओहोटीमुळे मोरा बंदरात भाविकांना उतरण्यासाठी व बोटी लागण्यासाठी पाणीच नसल्याने काही बोटी मोरा बंदरापासून अर्धा किमी अंतरावर चिखलात रुतून बसल्या. -   मोठ्या मुश्किलीने खचाखच भाविकांनी भरलेल्या राम अयोध्या आणि जय गणेश या बोटी बंदरापर्यंत पोहोचल्या. -   प्रशासनाच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभाराबाबत शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई