शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

पनवेलकरांचा श्वास कोंडला; एअर क्वालिटी इंडेक्समध्ये प्रदूषण ३०० पार?

By वैभव गायकर | Updated: November 8, 2023 20:08 IST

कळंबोली मधील चाचणी केंद्रात दि.8 रोजी हवेचा दर्जा अत्यंत नीचांकी दाखवण्यात आला.

पनवेल: महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने कळंबोली येथे बसविलेल्या हवेचे मोजमाप करणाऱ्या यंत्रणेत प्रदूषणाचे मोजमाप करणारे इंडेक्स 300 पार असल्याचे दाखविण्यात आल्याने पनवेल मधील प्रदूषणाचा विषय चर्चेत आला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने बेलापूर मधील स्टेट महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे चाचणी केंद्र, दुसऱ्या बाजूला कळंबोली मध्ये स्थित चाचणी केंद्र, आणि त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला तोंडरे येथे म्हणजे एमआयडीसी तळोजा येथे स्थित याठिकाणी हवेचे मोजमाप करणारे यंत्रणा बसविल्या आहेत.

कळंबोली मधील चाचणी केंद्रात दि.8 रोजी हवेचा दर्जा अत्यंत नीचांकी दाखवण्यात आला. याठिकाणी एअर क्वालिटी इंडेक्स इथे 300 च्या वर प्रदूषण दाखविण्यात आले. नायट्रोजन डायॉक्साईड, या घटकाचा प्रमाण धोकादायक पातळी ओलांडून, श्वसन प्रक्रियेला विघातक  परिणामकारक ठरू शकतो अशी शक्यता हवामान तज्ज्ञाकडून व्यक्त करण्यात येत आहे.मुंबई सह संपूर्ण एमएमआर झोन मध्ये प्रदूषणाची पातळी धोकादायक पोहचल्याने शासनाने विविध सूचना नागरिकांना दिल्या आहेत.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने बसविलेल्या यंत्रणेत दाखविलेल्या मशीनमध्येच हवेची गुणवत्ता खराब असल्याने एमपीसीबीने तळोजा एमआयडीसी मधील प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे खारघर मधील रहिवासी मंगेश रानवडे यांनी सांगितले.तळोजा एमआयडीसी मधील उग्र वासाने पनवेलकर त्रस्त आहेत.प्रदूषणकारी कारखाने प्रदूषणास सर्वात जास्त जबाबदार असल्याचे मत तळोजा मधील रहिवासी राजीव सिन्हा यांनी व्यक्त केले आहे.

कळंबोली पनवेल परिसरात एअर क्वालिटी इंडेक्स 300 पर्यंत नाही.हवेची मोजमाप करणारी यंत्रणेला पुन्हा नव्याने सुरु करून हवेची गुणवत्ता तपासावी लागेल. -प्रशांत भोसले (उपप्रादेशिक अधिकारी,एमपीसीबी )

पनवेल महानगरपालिकेच्या उपाययोजना -प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असल्याचा सूचना शासनाकडून प्राप्त होताच पनवेल महानगरपालिकेने उपायोजना राबविण्यास सूचना केल्या आहेत.आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाने उपायुक्त डॉ वैभव विधाते यांनी पथक स्थापन करून पालिका हद्दीत प्रदूषणाच्या ठिकाणी उपाययोजना व जनजागृतीसह सूचना केल्या आहेत.

टॅग्स :pollutionप्रदूषणNavi Mumbaiनवी मुंबई