शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एरोसिटी प्रकल्पालाही मिळणार गती; लवकरच मागविणार जागतिक निविदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 12:43 IST

सिडकोने कसली कंबर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. देशातील हे पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ असणार आहे

कमलाकर कांबळे

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाचे काम मार्गी लागल्याच्या पार्श्वभूमीवर सिडकोने आता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून दिल्लीच्या धर्तीवर नवी मुंबईतही एरोसिटी अर्थात हवाई शहर साकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली असून लवकरच प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, असे सिडकोच्या संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. देशातील हे पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ असणार आहे. येथे पहिल्या टेकऑफसाठी डिसेंबर २०२४ चा मुहूर्त निश्चित केला आहे. येत्या अडीच वर्षात विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. त्यामुळे   विमानतळाला आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर सिडकोचा भर आहे. दळणवळणाच्या प्रभावी साधनांबरोबरच विमानतळ क्षेत्रात दिल्लीच्या धर्तीवर १८० हेक्टर जागेवर भव्य एरोसिटी अर्थात हवाई शहर उभारण्यात येणार असून  त्यानुसार आराखडाही तयार केला आहे. नियोजित एरोसिटीमधील भूखंड विक्रीसाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

नवी मुंबईला मेट्रोला जोडणारदिल्ली एरोसिटीतून अवघ्या काही मिनिटांत विमानतळ गाठता येते. दिल्ली मेट्रो या एरोसिटीला जोडले आहे. त्याच धरतीवर नवी मुंबई मेट्रो नियोजित एरोसिटीला जोडण्याची योजना आहे. मेट्रोचा पहिला टप्पा प्रवासी वाहतुकीला सज्ज झाला आहे. खांदेश्वर ते नवी मुंबई विमानतळ हा मेट्रोचा तिसरा टप्पा असेल. 

दळणवळणाच्या साधनांवर भरसुमारे १६ हजार कोटी रुपये खर्चाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चारही बाजूचा शास्त्रोक्त व नियोजनबद्ध विकास व्हावा, या दृष्टीने सिडकोने मास्टर प्लान तयार केला आहे. यात सार्वजनिक वाहतुकीवर विशेष भर देण्यात आला आहे. राज्यातील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुंबई विमानतळाशी संलग्नता वाढावी, यादृष्टीने न्हावा शेवा-शिवडी सागरी मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. 

१७ पंचतारांकित हॉटेलचे नियोजन विमान प्रवाशांचा प्रवास, खरेदी आणि निवास एकाच ठिकाणी असावा, या दृष्टीने या हवाई नगरीचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे, या नियोजित हवाई शहरात सिडको कोणतेही बांधकाम करणार नाही. पंचतारांकित हॉटेलसाठी येथील भूखंडांची लिलाव पद्धतीने विक्री केली जाणार आहे. १७ पंचतारांकित हॉटेल व आलिशान मॉल असणार आहेत.