शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

चौकाचौकांत मतदारांचे आभार प्रदर्शन

By admin | Updated: June 2, 2017 06:02 IST

पनवेल महानगरपालिका निकाल लागून जवळपास आठ दिवस होत आले, तरीही उमेदवार निवडणुकीच्या मानसिकतेतून बाहेर पडताना

अरुणकुमार मेहत्रे/लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल महानगरपालिका निकाल लागून जवळपास आठ दिवस होत आले, तरीही उमेदवार निवडणुकीच्या मानसिकतेतून बाहेर पडताना दिसत नाहीत. सध्या अनेक ठिकाणी बॅनर, फलक लावून मतदारांचे आभार मानले जात आहेत. त्यामध्ये जिंकलेल्यांबरोबर पराभूत उमेदवारसुद्धा मागे राहिलेले नाहीत. कळंबोली वसाहतीत चौकाचौकांत हे बॅनर लावण्यात आले आहेत.महानगरपालिकेचा निकाल २६ मे रोजी जाहीर झालेला आहे. भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता प्रस्थापित झाली आहे. त्याचबरोबर शेतकरी कामगार, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. समाविष्ठ गाव आणि कळंबोलीतील तीन प्रभागांत आघाडीला बऱ्यापैकी जागा मिळालेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कळंबोलीत प्रभाग-आठचे विजयी उमेदवार सतीश पाटील, बबन मुकादम यांनी करवली चौकात मतदारांचे आभार व्यक्त करणारे बॅनर लावले आहेत. त्याच ठिकाणी प्रभाग-दहामधून निवडून आलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक विजय खानावकर यांनीसुद्धा बॅनरद्वारे मतदारांचे आभार व्यक्त केले आहेत. नगरसेविका कमल कदम यांचेही फलक येथे झळकत आहेत. प्रभाग क्र मांक-नऊमधून पराभूत झालेल्या शिवसेनेच्या उमेदवार भारती विश्वास पेटकर यांनी धनुष्यबाणाला मतदान करणाऱ्यांचे ऋण व्यक्त करणारे बॅनर चौकात लावले आहेत. सुधागड शाळेच्या जवळ शिवसेनेच्या उज्ज्वला म्हसकर यांनी मतदारराजाचे आभार मानणारे फलक लावले आहेत. ‘लढता लढता हरले जरी, हरल्याची मुळीच खंत नाही,’ अशा आशयाचा फलक सरस्वती काथारा यांनी लावला आहे. कामोठे वसाहतीत सेक्टर-२० येथे बॅनर लावून ललिता पाटील, उषा शितोळे, शंकर म्हात्रे, माया आहिरे यांनी आभार प्रदर्शन केले आहे. नगरसेविका हेमलता गोवारी, शीला भगत यांच्यासह रवींद्र जोशी, अर्जुन डांगे यांनीही सेक्टर-१७मध्ये फलक लावून मतदारांचे आभार मानले आहेत. सेक्टर-३६मध्ये शिवसेनेचे गोरखनाथ आहेर यांनीही मतदारांचे आभार व्यक्त केले आहेत.वाढदिवसाचेही बॅनरच बॅनर, १ जून रोजी अनेकांचे वाढदिवस असल्याने सिडको वसाहतीत विशेष करून कळंबोलीत मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांचाही समावेश आहे. त्या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी अभीष्टचिंतनाचे बॅनर अनेक ठिकाणी लावून, अनेकांनी आपल्या पराभवावर जणूकाही पांघरूण घालण्याचा प्रयत्न केल्याचे बॅनरबाजीवरून दिसून आले.