ठाणो : ठाण्यात मंगळसूत्र खेचण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढच होत आहे. गुरुवारी शहरातील विविध भागांत पाच ठिकाणी महिलांचे मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार घडले.
कासार वडवली, घोडबंदर रोडवरील ओवळा नाक्यावरून कॉसमॉस एंजल्स स्प्रिंग या इमारतीमधील सोमलता सोमण या दुकानातून घरगुती सामान खरेदी करून घरी सकाळी 8.3क् वाजताच्या सुमारास पायी येत होत्या. त्या वेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांचे मंगळसूत्र (64 गॅ्रम वजनाचे ) खेचून पलायन केले. मंगळसूत्र खेचताना झालेल्या झटापटीत त्यांना चोरटय़ांनी पाडून पळ काढला. वसंत विहार शाळेजवळ सायंकाळी 5.45 वाजताच्या सुमारास उषा श्रीनिवासन या शिक्षिकेबाबतही असेच घडले. सहकारी शिक्षिकेसोबत श्रीनिवासन त्यांच्या शाळेच्या गेट क्र.2 च्या बाहेर आल्या असता त्या वेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांचे एक लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला.
बाळकुमच्या आक्रीड रुणवाल गार्डन सिटी येथील रहिवासी कांचन श्रीधरन या ढोकाळी येथून कापूरबावडीकडे येत असताना त्यांच्या विरुद्ध दिशेने मोटारसायकलवरून दोघे जण आले. त्यांच्यापैकी एकाने 76 हजार रुपयांचे (तीन तोळ्यांचे) सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले. त्यानंतर अवघ्या 2क् मिनिटांमध्ये कोलशेत रोडवर 68 वर्षीय आशालता कापरे यांच्या गळ्यातील 62 हजारांची सोनसाखळी हिसकावली. (प्रतिनिधी)
च्इतर तीन घटना कोलशेत-कापूरबावडी भागात घडल्या. आझादनगर कॅसल मिल भागातील रहिवासी सुनंदा जाधव माजिवडा ते आझादनगर क्र.1 कॅसल मिल येथे सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास पायी येत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी 62 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले.