ठाणो : 19 ऑक्टोंबर रोजी विधानसभा निवडणूकीची मतमोजणी होणार आहे. ओवळा- माजिवडा मतदारसंघाची डॉ. काशिनाथ घाणोकर नाटय़गृह येथे आणि ठाण्याची खेवरा सर्कल येथील ठाणो महापालिकेच्या मंडईमध्ये सकाळी 7 वा. पासून मतमोजणीची प्रक्रीया होणार आहे.
त्यामुळे या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या भागातील काही रस्ते हे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दोन्ही मतमोजणी केंद्र पश्चिम बाजूस असल्याने धर्मवीरनगर, सुभाषनगर, लोक हॉस्पिटलकडून येणा:या आणि टिकूजीनी वाडी, निळकंठ वुडस, खेवरा सर्कलकडे जाणा:या सर्व वाहनांना तसेच नागरिकांना यादिवशी सकाळी 6 वाजल्यापासून निवडणूक निकालाची प्रक्रिया पूर्ण होईर्पयत ‘निहारीका’ सोसायटीपासून पुढे बंदी करण्यात आली आहे.
असा आहे पर्यायी मार्ग
त्याऐवजी धर्मवीरनगर, सुभाषनगर, लोक हॉस्पिटलकडून येणारी व टिकूजीनीवाडी, निळकंठ वुडस, खेवरा सर्कलकडे जाणा:या मार्गावरील वाहनांना व
नागरिकांना तुलसीधाम, मानपाडा मार्गे जाण्यासाठी मार्ग खुला करण्यात आला आहे.
टिकुजीनीवाडी, निळकंठ वुडस, खेवरा सर्कलकडून येणा:या वाहनांना आणि नागरिकांना मानपाडा, तुलसीधाम, लोक हॉस्पिटल, वसंत विहारमार्गे जाता येईल. पवारनगरसाठी गांधीनगरमार्गे किंवा तुलसीधाममार्गे येणारी वाहने लोक हॉस्पिटल, वसंत विहार सर्कल किंवा गांधीनगर चौकीमार्गे सोडण्यात येणार आहेत. अग्रवाल आर्केड, दोस्ती इंपोरिअल मार्गे खेवरा सर्कलमार्गे टिकूजीनीवाडी किंवा कोकणीपाडा येथील नागरिकांना मानपाडामार्गे जाता येणार आहे.
हेझलनट, जेमिनी, वुडरोज, मेरिडीअरकडून डॉ. काशिनाथ घाणोकर नाटय़गृहमागर्ेे येणा:या वाहनांना व नागरिकांना हेझलनटपासून पुढे प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरुन कोणतेही वाहन नेण्यास बंदी करण्यात आली आहे.
या मार्गावरील वाहनांना व नागरिकांना तुलसीधाम, तत्वज्ञान किंवा लोक हॉस्पिटल, वसंत विहार किंवा लोक हॉस्पिटल, गांधीनगर चौकीमार्गे प्रवेश देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
4अर्थात या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेबाबत कोणाची हरकत अथवा सुचना असल्यास तशी लेखी स्वरुपात मागणी वाहतुक नियंत्रण शाखेच्या पोलीस उपआयुक्त कार्यालयात देण्यात यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.