शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी रोडवर थाटली दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:41 IST

एपीएमसीजवळील प्रकार; अतिक्रमण करणाऱ्यांकडे दुर्लक्ष

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटजवळ रोडवर अनधिकृतपणे कांदा - बटाट्याचा व्यापार सुरू करण्यात आला आहे. यामुळे वाहतूककोंडी होत असून मार्केटमधील अधिकृत व्यापारावर परिणाम होत आहे. याविषयी तक्रारी करूनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.एपीएमसीने बिगरगाळाधारक भाजी व्यापाऱ्यांसाठी विस्तारित मार्केटची उभारणी केली आहे. मूळ मार्केटमधून विस्तारित मार्केटमध्ये जाण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करून डांबरी रोड तयार केला आहे. काही महिन्यांपासून या रोडवर कांदा व बटाट्याची विक्री करणाºया व्यापाºयांनी अतिक्रमण केले आहे. रोडच्या दोन्ही बाजूला शेकडो गोणी उतरवून अनधिकृतपणे व्यापार केला जात आहे. त्यांच्या बाजूला इतर फेरीवाल्यांनीही जागा अडविली असून त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊ लागला आहे. बाजार समितीने कांदा व्यापारासाठी स्वतंत्र मार्केटची उभारणी केली आहे. परंतु भाजी मार्केटच्या बाहेर सुरू असलेल्या व्यापारामुळे तेथील व्यापारावर परिणाम होऊ लागला आहे. रोडवर सुरू असलेला हा व्यापार थांबविण्यात यावा व संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी दक्ष नागरिकांनी व बाजार समितीमधील अधिकृत व्यापाºयांनी केली होती. घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघानेही एपीएमसी पोलीस स्टेशन, बाजार समिती प्रशासनासह महानगरपालिकेच्या तुर्भे विभाग अधिकाºयांना याविषयी वारंवार पत्र दिले आहे. पण अद्याप संबंधितांवर ठोस कारवाई झालेली नाही.बाजार समिती परिसरामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांची संख्याही वाढू लागली आहे. पदपथ व रोडवर जिथे जागा मिळेल तेथे अतिक्रमण करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. महापालिका प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी व्यापाºयांनी केली आहे. विस्तारित मार्केटच्या परिसरामध्ये फेरीवाले येऊ नयेत यासाठी गेट बांधावे, अशी मागणीही केली आहे.भाजी मार्केट व विस्तारित मार्केटच्या मध्ये रोडवर कांदा-बटाट्याचा व्यापार सुरू आहे. त्यांच्यावर पालिकेने कारवाई करावी. येथे पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी रोडवर गेट तयार करावे व बाजार समितीने तेथे सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी.- शंकर पिंगळे,व्यापारी प्रतिनिधी, भाजी मार्केट

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई