- नारायण जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यातील लोकसभेच्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघांवर शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीने अपेक्षेप्रमाणे वर्चस्व कायम राखले आहे. पक्ष कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे अन् नरेंद्र मोदीलाटेची लाभलेली जोड यामुळे प्रतिस्पर्धी काँगे्रस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवारांचा २०१४ पेक्षा जास्त मतांनी दणदणीत पराभव झाला. मतदारांनी उमेदवारांपेक्षा प्रखर राष्ट्रवादावर स्वार झालेल्या नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी युतीच्या पारड्यात मत टाकल्याचे निकालावरून दिसत आहे. बहुजन वंचित आघाडीने महाआघाडीच्या उमेदवारांना अपशकून केला, असे म्हणण्यास वाव नाही.ठाण्यात शिवसेनेचे राजन विचारे यांनी राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा चार लाखांहून अधिक मतांनी, कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांचा साडेतीन लाखांहून अधिक मतांनी, तर भिवंडीतून भाजपचे कपिल पाटील यांनी काँगे्रसच्या सुरेश टावरे यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव करून विरोधकांचे अंदाज ठाणे खाडीत बुडवले आहेत. राज ठाकरे यांचा करिष्मा जिल्ह्यात कुठेच चालला नसल्याचे निवडणूक निकालावरून दिसत आहे.
या निकालांनी आगामी विधानसभा निवडणुकीत बेलापूर, ऐरोली, कळवा-मुंब्रा, शहापूर या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांना भगदाड पडण्याची भीती निर्माण झाल्याने तेथील विद्यमान आमदार संदीप नाईक, जितेंद्र आव्हाड, पांडुरंग बरोरांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा माजी मंत्री गणेश नाईक यांची चिंता वाढवली आहे.
भार्इंदरमध्ये त्यांना काँगे्रसच्या मुझफ्फर हुसेन यांची चांगली साथ मिळाली. परांजपे यांनी सोशल मीडियासह जोरदार प्रचार सुरू केला.उमेदवाराचे शिक्षण, गुन्हेगारी पार्श्वभूमी या मुुद्द्यांचा त्यांनी खुबीने प्रचार केला. त्याचा त्यांना प्रचारात फायदा दिसत होता. मात्र, ठाणे शहरातील नाईक-आव्हाड गटांतील दुफळी आणि संघटनात्मकदृष्ट्या कमजोर बांधणी, याचा त्यांना फटका बसला. भाजपच्या नगरसेवकांनी प्रारंभी विचारे यांना असहकार पुकारला होता. मात्र ठाणे, नवी मुंबईतील शिवसैनिकांनी घेतलेली मेहनत, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे शहरावरील वर्चस्व आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा त्यांच्या मदतीला धावून आल्याने विचारे हे दणदणीत मतांनी विजयी झाले.भ्रष्टाचाराचा पैसा, घराणेशाहीला नाकारलंपिंपरी :मावळची निवडणूक ही जनतेने हातात घेतली होती. राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांचा भ्रष्टाचाराचा पैसा आणि घराणेशाहीला मतदारांनी नाकारले आहे, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. विजयी झाल्यानंतर बारणे यांच्याशी साधलेला हा संवाद.प्रश्न : निवडणूक निकालाचे विश्लेषण काय?उत्तर : निकाल हा जनतेने दिलेला कौल आहे. भ्रष्टाचाराविरोधात, घराणेशाहीपेक्षा विकासाला मत दिले आहे. भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे चीज झाले आहे. मी सामान्य कार्यकर्ता आणि आमच्या कुटुंबात कोणी खासदार, आमदार नाही. कामाच्या जोरावर मला यश मिळाले. त्यात सर्वांची साथ लाभली.पवार घराण्याविरोधात लढताना दडपण होते का?मला कोणतेही दडपण नव्हते. दडपण होते ते अजित पवार यांना. पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत जेवढे फोन केले नसतील, तेवढे या वेळी केले होते. हा पार्थ यांचा पराभव नसून, अजित पवार यांचा पराभव आहे. जनतेने पवारांना त्यांची जागा दाखविली आहे. घराणेशाही नाकारली आहे.यश आणि मताधिक्य अपेक्षित होते?दोन लाख मतांनी विजयी होऊ असा आत्मविश्वास होता. कारण मावळच्या जनतेला लादलेला उमेदवार नको होता. महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून राष्टÑवादीचा भ्रष्टाचार पिंपरी-चिंचवडकरांनी पाहिला होता. भ्रष्टाचाराचा पैसा घेऊन राष्टÑवादी मतदारसंघात उतरली होती. भ्रष्टाचाराच्या पैशाला जनतेने नाकारले आहे.
पवार यांच्या तिसऱ्या पिढीला नाकारलेआताचा मावळ लोकसभा मतदारसंघ पूर्वीच्या खेड व बारामती मतदारसंघाला जोडलेला होता. त्या वेळी बारामती लोकसभा मतदारसंघात असलेल्या पिंपरी-चिंचवडचे नेतृत्त्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, दुसºया पिढीतील अजित पवार यांनी केले आहे. दरम्यान, २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर स्वतंत्र मावळ लोकसभा मतदारसंघ तयार झाला.मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ व २०१४ या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे उमेदवार गजानन बाबर व श्रीरंग बारणे हे खासदार झाले. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचा गड रोखण्यासाठी अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवार यांना थेट निवडणूक रिंगणात उतरविले. मात्र, पिंपरी-चिंचवडच्या मतदारांनी पवार यांच्या तिसºया पिढीला निवडणुकीत नाकारल्याचे दिसत आहे.
ज्या ज्या मतदारांनी मला मतदान केले, त्या सर्वांचे मी आभार मानतो. दरम्यान, आमच्याकडून काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या भविष्यात सुधारण्याचा प्रयत्न करेन. मोदी सरकारला जनतेने स्वीकारले आहे. निवडून आलेल्या सगळ्या उमेदवारांचे मनापासून अभिनंदन करतो.- पार्थ पवार