शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

सारसोळे येथे सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न

By admin | Updated: January 10, 2015 01:49 IST

सारसोळे येथे महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी जबरी दरोड्याची घटना घडली. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यामधे पती-पत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नवी मुंबई : सारसोळे येथे महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी जबरी दरोड्याची घटना घडली. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यामधे पती-पत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सारसोळे (नेरूळ) सेक्टर ६ येथे राहणाऱ्या विनंती रवींद्र पाटील (३१) यांच्या घरी दरोड्याची घटना घडली. विनंती 'ा नवी मुंबई पोलीस कर्मचारी असून त्या मुख्यालयात कार्यरत आहेत, तर त्यांचे पती रवींद्र पाटील हे महापालिकेचे कर्मचारी आहेत. सारसोळे गाव येथे काही दिवसांपूर्वीच ते राहायला आले होते. त्यानुसार वरच्या मजल्याचे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर ते लहान मुलासह राहत होते. शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक चोर त्यांच्या घरात घुसला. स्वयंपाक खोलीची स्लायडिंग खिडकी उघडून त्याने घरात प्रवेश केला होता. मात्र घरात घुसलेला चोर अंधारामुळे घरातील भांड्यांना धडकला. त्यामुळे भांड्यांचा आवाज झाल्याने दोघाही पती-पत्नीला जाग आली. घरामधे कोण घुसले आहे हे पाहण्यासाठी दोघेही स्वयंपाक खोलीमधे गेले असता त्यांना समोरच एक चोर उभा असल्याचे दिसले. त्यांनी धाडसाने या चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चोरट्याने त्याच्याकडील धारदार हत्याराने पती-पत्नीवर वार केले. परंतु जखमी अवस्थेत त्यांनी चोराला पकडण्याचा प्रयत्न करूनही अखेर चोरट्याने पळ काढला. चोरट्याच्या या हल्ल्यात पाटील दाम्पत्याच्या हातावर आणि डोक्यावर जखमा झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी नेरूळच्या शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरोड्याच्या घटनेवेळी पाटील यांचे दीड महिन्याचे बाळ देखील त्यांच्यासोबत घरामध्ये होते. सुदैवाने त्याला कसलीही दुखापत झालेली नाही. याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीसाठी घरात घुसलेल्या चोरट्याला पाटील दाम्पत्याने प्रतिकार केल्याने पळ काढावा लागला आहे. परंतु एक चोर घरात घुसला असताना त्याचे काही साथीदार घराबाहेर उभे होते असे काही स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश पालांडे यांनी सांगितले. सशस्त्र दरोड्याच्या या प्रकारामुळे सारसोळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)