शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांवर मोक्काअंतर्गत कारवाई, तिघांना अटक : तळोजा परिसरामध्ये निर्माण केली होती दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 02:26 IST

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये दहशत निर्माण करणा-या टोळीतील तिघांना गजाआड करण्यात गुन्हे शाखेने यश मिळविले आहे. या प्रकरणी तिघांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

नवी मुंबई : तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये दहशत निर्माण करणा-या टोळीतील तिघांना गजाआड करण्यात गुन्हे शाखेने यश मिळविले आहे. या प्रकरणी तिघांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.पनवेलजवळील किरवली येथील प्लाझा स्टील गोडाऊनमध्ये नोव्हेंबर २०१७ मध्ये दरोडा पडला होता. ८ जणांनी गोडाऊनमध्ये प्रवेश करून फिर्यादी व इतरांना चाकूचा धाक दाखवून ८५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. गुन्हे शाखेने कौशल्याने या गुन्ह्याचा तपास करून बरकतअली अब्दुल कलाम चौधरी, जियाउद्दीन अच्छनखान, कलाम समशुद्दीन खान या तिघांना अटक केली आहे. या तिघांकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार व रोख रक्कम जप्त केली होती. या आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी स्वतंत्र टोळी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ४ डिसेंबरला रात्री २ वाजता रोहिंजन येथे चोरी करताना हटकले म्हणून चाकूने वार करून पळ काढला. २१ जून २०१७ रोजी नावडा पेट्रोल पंपावर ट्रक चालकास लुटले होते.अटक केलेले तीन आरोपी व फरार असलेल्या आरोपींनी आयुक्तालय क्षेत्रामध्ये खून,दरोडा, जबरी चोरी, घरफोडीसारखे गंभीर गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यातआला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटकRobberyदरोडा