शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

दहा हजार गुंतवणूकदारांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 23:08 IST

अधिक नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या मार्केटिंग कंपन्या शहरात मोठ्या संख्येने सक्रिय आहेत.

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : अधिक नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या मार्केटिंग कंपन्या शहरात मोठ्या संख्येने सक्रिय आहेत. त्यांच्याकडून दहा महिन्यांत दहा हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. त्या माध्यमातून जवळपास ३३ कोटींचा अपहार झाला असून, अनेकांना अटकही करण्यात आली आहे.झटपट श्रीमंतीच्या मोहापोटी अनेकांकडून सोयीचे मार्ग निवडले जात आहेत. याचा फायदा घेऊन मल्टिलेवल मार्केटिंगच्या कंपन्यांनी सर्वत्र त्यांचे जाळे पसरवले आहे. त्यांनी नेमलेल्या एजंटकडून अधिक नफ्याचे आमिष दाखवून नागरिकांना गुंतवणुकीला भाग पाडले जात आहे. त्यानुसार अनेक जण अशा कंपन्यांमध्ये पाच ते दहा हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली जात आहे. तर गुंतवणूकदारांचा आकडा वाढवण्यासाठी कंपन्यांकडून सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना काही प्रमाणात नफाही मिळवून दिला जातो. मात्र, गुंतवणूकदार वाढल्यानंतर जमा झालेले कोट्यवधी रुपये घेऊन कंपनीचालकांकडून पोबारा केला जात आहे. मुळात आरबीआयच्या नियमावलीनुसारच गुंतवणूक करून घेणे व नफा देणे बंधनकारक आहे. त्यानंतरही केवळ फसवणुकीच्या उद्देशाने कंपन्यांची स्थापना करून आरबीआयच्या नियमांची पायमल्ली करून पैशाची गुंतवणूक करून घेणाºया कंपन्या चालवल्या जात आहेत. अशा कंपन्यांकडून नवी मुंबईत मागील दहा महिन्यांत दहा हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार त्यांची ३३ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाली आहे. त्यामध्ये राईस पुलर, शक्ती मल्टिपर्पज सोसायटी, एम. पिक्चर्स व कॅपिटल क्लब अशा कंपन्यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल असून या कंपन्यांच्या प्रमुख व्यक्तींसह दलालांनाही अटक करण्यात आलेली आहे.भाड्याची कार्यालये घेऊन आलिशान कार्यालय थाटल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांना भुरळ घालणारे सेमिनार घेतले जातात. त्यामध्ये थोड्या फार रकमेच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याची फसवी आमिषे दाखवली जातात. त्याशिवाय सोन्याचे सिक्के, कार व इतर वस्तू भेट स्वरूपात देण्याचेही आमिष दाखवले जाते. हे पाहून सर्वसामान्य व्यक्तीचे डोळे दीपत असल्याने, त्यांच्याकडून झटपट श्रीमंतीच्या मोहापोटी लाखो रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. अशा कंपन्यांकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांकडे धाव घेतली जाते. मात्र, तोपर्यंत संबंधितांनी जमा रकमेचा अपहार करून पळ काढलेला असतो. यामुळे अनेकांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांनाही अपयश येत आहे.मार्केटिंग कंपन्यांपाठोपाठ आभासी चलनाद्वारे गुंतवणूक करून घेणाºयाही कंपन्या शहरात धुमाकूळ घालत आहेत. अशा काही कंपन्यांच्या दलालांनाही यापूर्वी पोलिसांनी अटक केलेली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून या कंपन्यांचा संपूर्ण व्यवहार व प्रचार होत आहे. तर हे जाळे चालवणाºया व्यक्ती परराज्यातून सूत्रे हाताळत असतात, यामुळे त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचू शकलेले नाहीत.>पोलिसांच्या आवाहनाकडेही दुर्लक्षजादा नफ्याचे आमिष दाखवणाºया तसेच इतर बेकायदेशीर कंपन्यांमध्ये गुंतवणूक न करण्याचे आवाहन पोलिसांकडून मागील अनेक वर्षांपासून सातत्याने केले जात आहे. त्यानंतरही दलालांकडून दिली जाणारी हमी व अधिक नफ्याचे आश्वासन याला अनेक जण बळी पडत आहेत. त्यामुळे मागील दहा महिन्यांत दहा हजारांहून अनेकांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांची ३३ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झालेली आहे.>झटपट श्रीमंतीचा मोह पडतोय महागातसध्याच्या स्पर्धेच्या काळात अनेकांकडून एक दुसऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीशीही स्पर्धा केली जात आहे. त्यामुळे इतरांप्रमाणेच आपणही श्रीमंत व्हावे, या उद्देशाने कमी कालावधीत जादा नफा देणाºया कंपन्यांमधून गुंतवणूक करण्यावर भर दिला जात आहे; परंतु अशा कंपन्यांच्या व्यवहाराला कोणताही कायदेशीर आधार नसल्याने ठरावीक कालावधीनंतर गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे.>नागरिकांनी कष्टाचा पैसा गुंतवणूक करण्यासाठी अधिकृत मार्गाचाच वापर केला पाहिजे; परंतु फसव्या कंपन्यांच्या आमिषाला बळी पडून अनेक जण वेगवेगळ्या बेकायदेशीर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यांची फसवणूक झाल्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली जाते. त्यानुसार अनेक कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करून संबंधितांवर कारवाईही केलेली आहे; परंतु नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता, योग्य पडताळणी करूनच पैशाची गुंतवणूक केली पाहिजे.- प्रवीणकुमार पाटील,पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.