रसायनी : मागील दोन दिवसांपासून रसायनी परिसरात तापमानाचा पारा चढलेला आहे. रविवारी २६ मार्च रोजी ४२ अंश सेल्सियस एवढेतापमान होते. या वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत.पाताळगंगा औद्योगिक परिसरात नेहमी गजबजलेल्या मोहोपाडा बाजारपेठ दुपारी शुकशुकाट असतो. याला अपवाद रविवारचा बाजार असतो. रविवारी उल्हासनगर, ठाणे, भिवंडी, कर्जत आदी ठिकाणांहून विक्रेते मोहोपाडा येथे येतात. परिसरातील नागरिकही रविवारच्या बाजारात खरेदीसाठी गर्दी करतात. उन्हाचा पारा चढल्याने शीतपेय, रसवंतीगृहामध्ये गर्दी होत आहे. वर्षभरासाठी लागणारे तिखट करण्यासाठी मिरच्या वाळवणे, देठ काढणे, मसाला तळणे व डंकावर घेऊन जाणे या कामासाठी गृहिणींची लगबग चालू आहे. बाजारात खरेदीसाठी गृहिणींची गर्दी होत आहे.
शहरात तापमानाचा पारा चढला
By admin | Updated: March 27, 2017 06:20 IST