शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

अध्यापक विद्यालयांना घरघर, नोकरी नसल्याने तरुणांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 02:49 IST

शिक्षकाची नोकरी मिळणे अवघड झाल्याने तरुणांनी अध्यापक विद्यालयांकडे पाठ फिरविली आहे.

- अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : शिक्षकाची नोकरी मिळणे अवघड झाल्याने तरुणांनी अध्यापक विद्यालयांकडे पाठ फिरविली आहे. त्याचा फटका अध्यापक विद्यालयांना बसला आहे. विद्यार्थ्यांअभावी रायगड जिल्ह्यातील आठ अध्यापक विद्यालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत.राज्य शासनाच्या उदारमतवादी धोरणामुळे खासगी शैक्षणिक संस्थांनीही डीएड अध्यापन सुरू केले आहे. या खासगी अध्यापक विद्यालयात कमी गुण असणाऱ्यांनाही प्रवेश मिळू लागला. त्यामुळे शेकडो तरु ण डीएड होऊन बाहेर पडले आहे. मात्र, कुठेही नोकरी मिळत नसल्याने या तरुणांची निराशा झाली आहे, तसेच अलीकडे डीएड झालेल्या तरु णांसाठी सीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली.गुणवत्ता यादीत स्थान मिळत नसल्याने बेरोजगार शिक्षकांची फौज गावागावात दिसत आहे. डीएड बेरोजगारांची ही अवस्था पाहून आता तरुणांनी डीएडकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे अध्यापक विद्यालय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. रायगड जिल्ह्यात एकूण वीस अध्यापक विद्यालये होती. त्यापैकी २0१५ साली दहा विद्यालये बंद करण्यात आली. उर्वरित दहापैकी आठ विद्यालयांमध्ये आता विद्यार्थीच नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.यात जिल्हा शैक्षणिक व्यावसायिक संस्था (पनवेल), शासकीय अध्यापक विद्यालय (माणगाव), डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय (पेझारी), पंचरत्न अध्यापक विद्यालय (पिरकोण), अंजुमान इ इस्लाम विद्यालय (म्हसळा), नवजीवन नेरळ (मराठी, इंग्रजी), प्रभाकर पाटील अध्यापक विद्यालय (वेश्वी) या विद्यालयांचा समावेश आहे.>बंद झालेली अध्यापक विद्यालयेकोकण उन्नती मित्र मंडळ अध्यापक विद्यालय, श्रीवर्धनजनता शिक्षण प्रसारक मंडळ अध्यापक विद्यालय, कामोठेओम नमो प्रतिष्ठान अध्यापक विद्यालय, खारघरपिल्लई अध्यापक विद्यालय, नवीन पनवेलडी एम एम अध्यापक विद्यालय, डिकसळसह्याद्री शिक्षण प्रसारक मंडळ अध्यापक विद्यालय, पेडलीजनता शिक्षण प्रसारक मंडळ अध्यापक विद्यालय, खारघरमहात्मा एज्युकेशन सोसायटी अध्यापक विद्यालय, रसायनीमहात्मा एज्युकेशन सोसायटी अध्यापक विद्यालय, नवीन पनवेलन्यू कळंबोली एज्युकेशन सोसायटी अध्यापक विद्यालय, कळंबोलीडीएड करूनही नोकरी मिळत नसल्याने तरुणांनी अध्यापक विद्यालयांकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे अनेक डीएड विद्यालये बंद करावी लागली आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास उर्वरित विद्यालये सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे.- शिवराम सांगळे, अधीक्षक, पनवेल, डायट

टॅग्स :Teacherशिक्षक