शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

एपीआर बहिष्कारावर शिक्षक संघटना ठाम

By admin | Updated: October 17, 2015 02:00 IST

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम नाकारणाऱ्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या तहसीलदारांच्या आदेशानंतरही शिक्षक त्यांच्या

उरण : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम नाकारणाऱ्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या तहसीलदारांच्या आदेशानंतरही शिक्षक त्यांच्या बहिष्काराच्या निर्णयावर ठाम आहेत. तहसीलदारांनी कारवाईच्या बडग्याविरोधात येथील विविध संघटना एकवटल्या आहेत. त्यामुळे तहसील, प्रशासनाविरोधात शिक्षक अशा नव्या संघर्षाला आता प्रारंभ झाला आहे.राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम येथील शिक्षकांवर सोपविण्यात आले होते. मात्र उरण येथील ६९ शिक्षकांनी एका न्यायालयीन निकालाचा आधार घेत या कामावर बहिष्कार टाकीत काम करण्यास नकार दिला होता. काम नाकारणाऱ्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाच्या सूचना उरण गटशिक्षण अधिकाऱ्यांना उरण तहसीलदारांनी दिल्या आहेत. मात्र तहसीलदारांच्या आदेशांना केराची टोपली दाखवित बहिष्कारावर ठाम असल्याचे पत्रकच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जिल्हा अध्यक्ष कौशिक ठाकूर, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष महेंद्र गावंड, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष बा.ना. ठाकूर यांनी काढले आहे. यासाठी त्यांनी न्यायालयाच्या एका निर्णयातील पाच मुद्यांचा आधार घेतला आहे. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम नाकारणाऱ्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णयावर ठाम असल्याचे उरण तहसीलदार नितीन चव्हाण यांनी सांगितले. या शिक्षकांवर कारवाईसाठी उरण गटशिक्षण अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.