शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक, पदवीधर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; १ लाख ७७ हजार ३२ मतदार

By कमलाकर कांबळे | Updated: May 28, 2024 19:51 IST

विधानपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, कोकण विभाग शिक्षक, पदवीधर मतदारसंघात २६ जून रोजी मतदान

नवी मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. कोकण विभागाच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त तथा सह निवडणूक अधिकारी अमोल यादव यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीची माहिती दिली.

या निवडणुकीसाठी बुधवार, २६ जून रोजी मतदान होणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार शुक्रवार, ३१ मे रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे. त्यानुसार या निवडणुकीसाठी ७ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी १० जून रोजी सकाळी ११ वाजेपासून केली जाईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १२ जून दुपारी ३ वाजेपर्यंत असेल, अशी माहिती अमोल यादव यांनी दिली.

२६ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होईल. तर १ जुलै रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरूवात होईल. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शुक्रवार, ५ जुलै रोजी पूर्ण होईल, असे यादव यांनी स्पष्ट केले आहे. आचारसंहितेबाबत माहिती देताना उपआयुक्त अमोल यादव म्हणाले की, कोकण विभागात जिल्हास्तरावर आचारसंहिता स्थायी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत जिल्हाधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष, माध्यम प्रमाणीकरण व देखरेख समिती व भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस उपआयुक्त (करमणूक) संजीव पालांडे, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे उपस्थित होते.

१ लाख ७७ हजार ३२ मतदारमुंबई पदवीधर मतदारसंघात स्त्री ३७ हजार ६१९ तर पुरुष ५३ हजार ६४१ असे एकूण ९१ हजार २६३ मतदार आहेत. तर मुंबई शिक्षक स्त्री १० हजार ८४९ , तर पुरुष ३ हजार ६६६ असे एकूण १४ हजार ५१५ मतदार आहेत. त्याचप्रमाणे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात स्त्री ७४ हजार ५७५, तर पुरुष १ लाख २ हजार ४४२ असे एकूण १ लाख ७७ हजार ३२ मतदार आहेत. यात २८ मे रोजी नोंदणी होणाऱ्या पदवीधर मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक