शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

टँकर लॉबीला ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 04:26 IST

पनवेल शहर व ग्रामीण भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

मयूर तांबडे पनवेल : पनवेल शहर व ग्रामीण भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महापालिकेवर मोर्चे, उपोषण करूनदेखील पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई टँकर लॉबीच्या पथ्यावर पडली आहे. टँकरच्या पाण्याला मागणी वाढल्याने आवाच्या सव्वा दरात पाणी विकले जात आहे. एकूणच पनवेलमधील पाणीटंचाईमुळे येथील टँकर लॉबीला मात्र अच्छे दिन आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.एकीकडे टँकरमुक्त महाराष्ट्राची स्वप्ने सरकार दाखवत असताना, पनवेलसारख्या शहरात गेली अनेक वर्षे उन्हाळ्यात पाण्याच्या तुटवड्यामुळे खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ दरवर्षी येते. पुरविण्यात येणारे पाणी सोसायट्यांना अपुरे पडत असल्याने अनेक सोसायट्यांकडून खासगी टँकरची मागणी केली जाते. मात्र, याच मागणीचा गैरफायदा टँकरचालक-मालक घेऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, मागील दीड-दोन महिन्यांत शहरातील पाणीप्रश्न अधिक गंभीर बनला आहे. त्यामुळे टँकरच्या पाण्याला मागणी वाढली आहे. याचा नेमका फायदा टँकरचालकांनी घेतला आहे. सध्या एक टँकर पाण्यासाठी १५०० ते दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत. काही मोठ्या सोसायट्यांमध्ये तर दिवसाला तीन ते चार टँकरने पाणी लागते. नाइलाजास्तव सोसायट्यांना पाण्यासाठी हा खर्च करावा लागत आहे. खासगी टँकरच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेविषयी खात्री नसल्याने हे पाणी दूषित असल्याच्या तक्र ारी पुढे येत आहेत. हा पाणीपुरवठा म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला जात आहे. ऐन उन्हाळ्यात शहरी आणि ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फायदा घेऊन टँकर लॉबीने नागरिकांची लूट चालविल्याचा आरोप होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना तर हंडाभर पाण्यासाठीही वणवण करावी लागत आहे. यासंदर्भात महापालिकेकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.सोसायट्यांमधील रहिवासी टँकरच्या पाण्यावर जगत आहेत. काही सोसायट्यांतील रहिवासी पिण्याबरोबरच स्वच्छतागृहातही बंद बाटलीतील बिस्लरी पाण्याचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात बिस्लरी पाण्याच्या बाटल्यांनाही चांगली मागणी वाढल्याचे दिसून आले आहे.