शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐनवेळी भाषणास संधी नाही, अजितदादांचा मोठा निर्णय; म्हणाले, “मी अन् एकनाथरावांनी ठरवलेय की...”
2
"आमच्याविषयी बोलू नका, स्वतःचा रेकॉर्ड पाहा"; वक्फ कायद्यावरुन बोलणाऱ्या पाकला भारताने फटकारलं
3
आता अशा 'लाडक्या बहि‍णींना' १५०० रुपयांऐवजी केवळ ५०० रुपयेच मिणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं!
4
"धमकावण्याचा प्रयत्न...!"; सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध ED ने आरोपपत्र दाखल केल्यावरून काँग्रेस भडकली
5
तुमचे १०० बाप खाली आले तरी शिवसेनेचे अस्तित्व संपवता येणार नाही; ठाकरेंचा नाशिक दौरा, टिझर आला
6
PM मोदींच्या गुजरातमधून सुरुवात, काँग्रेसमध्ये नवचैतन्य येणार; राहुल गांधींचा प्लान काय?
7
PBKS vs KKR : हा तर IPL मधील बिग फ्रॉड! वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात फसल्यावर ग्लेन मॅक्सवेल ट्रोल
8
ईडीची सहारा समूहावर मोठी कारवाई! लोणावळ्यातील अ‍ॅम्बी व्हॅलीची ७०७ एकर जागा जप्त
9
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का; MUDA प्रकरणात लोकायुक्त पोलिसांच्या क्लीन चिटवर न्यायालय समाधानी नाही
10
१०० कोटींच्या ऑर्डरची बतावणी करत बिहारमध्ये बोलावून खून..! पुण्यातील उद्योजकाच्या हत्येने खळबळ
11
"लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत आता ५०० रुपयांवर आली, उद्या...!"; राऊतांचा हल्लाबोल
12
PBKS vs KKR : जुन्या संघावर राग काढायचं सोडा एक धाव नाही काढली; श्रेयसच्या पदरी पडला सातवा भोपळा!
13
Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अमेरिकेच्या सर्वात शक्तिशाली फायटर जेटच्या चिंधड्या! रशियाच्या 'या' मिसाइलनं केली कमाल; टेंशनमध्ये आला पाकिस्तान
14
दानवेंसोबतचा वाद मातोश्रीवर मिटला! ठाकरेंची भेट घेतल्यावर खैरे म्हणाले, “आम्ही दोघे आता...”
15
अयोध्येतील राम मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, तामिळनाडूतून ईमेल, सुरक्षा यंत्रणा अलर्ट!
16
मंत्रालयातल्या निवृत्त कर्मचाऱ्याने सायबर फसवणुकीमुळे संपवले जीवन; आरोपीला गुजरातमधून अटक
17
“मंत्र्यांचे पगार, बंगले नुतनीकरणास निधी, पण शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसा नाही”: आदित्य ठाकरे
18
चैत्र संकष्ट चतुर्थी: राशीनुसार ‘या’ मंत्रांचे जप करा, भरघोस लाभ मिळवा; कोणते उपाय करावेत?
19
ज्या बंदुकीच्या टोकावर दरोडेखोरांनी ३० तोळे सोनं लुटलं तीच निघाली प्लॅस्टिकची..! पुण्यातील प्रकार
20
रस्ता ओलांडताना भरधाव ट्रेलरची धडक, आठ वर्षाची चिमुकली जागीच ठार, नवी मुंबईतील घटना

१५ ते १९ मार्चदरम्यान नवी मुंबईत तमाशा महोत्सव, तमाशाप्रेमींना मोफत प्रवेश

By नारायण जाधव | Updated: March 14, 2023 16:37 IST

यंदा वाशी सेक्टर-१ ए मधील नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा संकुलात संध्याकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत रंगणार आहे. 

नवी मुंबई : नवी मुंबईत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने १५ मार्च ते १९ मार्चदरम्यान वाशी येथे तमाशा महोत्सव आयोजित केला आहे. कोरोना काळानंतर शासनाचा हा तमाशा महोत्सव होत आहे. महोत्सवात तमाशाप्रेमींना मोफत प्रवेश असल्याने त्याचा लाभ घ्यावा, असे शासनाने कळविले आहे.

यंदा वाशी सेक्टर-१ ए मधील नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा संकुलात संध्याकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत रंगणार आहे. 

असा आहे तमाशांचा कार्यक्रम -याअंतर्गत १५ मार्च रोजी तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजवाडीकर, १६ मार्च रोजी अंजलीराजे नाशिककर, १७ मार्च रोजी भीमा नामा अंजाळेकर, १८ मार्चला लता-लंका पाचेगांवकर आणि १९ मार्च विठा भाऊ मांग नारायणगांवकर, लोकनाट्य मंडळ तमाशा सादर करणार आहेत.

म्हणून महोत्सवासाठी नवी मुंबईची निवड -महाराष्ट्रात तमाशा लोककला सर्वत्र लोकप्रिय असली तरी तिची क्रेझ पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगलीसह ज्या सोलापूर आणि कोल्हापुरात आहे, त्या भागातील रहिवाशांची नवी मुंबईत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे मोठी आहे. त्यामुळे दरवर्षी येथे महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग तमाशा महोत्सव आयोजित करतो. राज्यभरातील लोककलावंत नवी मुंबईत येत आहेत, त्यांना आधार द्या, सन्मान करा. लोककला ही आपली ओळख आहे, तिला जपा, असे आवाहन तमाशाप्रेमींनी केले आहे.विठाबाई नारायणगाव पुरस्काराचे वितरणयंदाच्या तमाशा महोत्सवात शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगाव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यात २०१८-१९ साठी गुलाबबाई संगमनेकर, २०१९-२० साठी अतांबर शिरढोणकर आणि २०२०-२१ साठी संध्या रमेश माने या दिग्गजांना हे पुरस्कार १६ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता देण्यात येणार आहे. कोविडमुळे दोन वर्षे महोत्सव न झाल्याने त्या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरणही यंदा करण्यात येत आहे.यांची आहे उपस्थितीकार्यक्रमासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार राजन विचारे आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे आणि संचालक विभिषण चवरे उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई