शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कामाच्या ठिकाणीच घ्या आरोग्याचीही काळजी

By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 16, 2024 17:27 IST

जिमसह बॅडमिंटन कोर्टची सोय: सीबीडी पोलिस ठाण्याचे पालटले रुपडे

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : रोजच्या कामाचा ताण व इतर कारणांनी पोलिसांचे प्रकृतीकडे होणारे दुर्लक्ष टाळण्यासाठी थेट पोलिस ठाण्यातच जिम व बॅडमिंटन कोर्टची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेच्या सहकार्याने सीबीडी पोलिस ठाण्याच्या आवारात हा अभिनव प्रकल्प राबवण्यात आला आहे. पोलिस ठाण्यालगतचे भंगार हटवल्यानंतर तिथली जागा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपयोगी आणली आहे. 

पोलिसांनी विविध गुन्ह्यात, अपघातांमध्ये तसेच इतर कारणांनी जप्त केलेली वाहने व इतर साहित्य पोलिस ठाण्याच्या आवारातच साठवले जाते. यामुळे पोलिस ठाण्याची शोभा जात असते. बहुतांश पोलिस ठाण्याला याच कारणामुळे अवकळा आली आहे. त्यावर पर्याय म्हणून पोलिस ठाण्याच्या आवारातील जप्तीतली भंगार वाहने तळोजा येथे जमा करण्यास सुरवात झाली आहे. यामुळे सीबीडी पोलिस ठाण्याच्या आवारातील जप्तीतली वाहने हटल्याने जागा मोकळी झाली होती. या जागेचा पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या उपयुक्त वापर करण्याची संकल्पना वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी पालिका अधिकाऱ्यांकडे मांडली होती. त्यानुसार तिथे ओपन जिम उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याशिवाय काही दिवसांपूर्वी तिथल्याच जागेत बॅडमिंटन कोर्ट देखील तयार करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते सह आयुक्त संजय येनपुरे, उपायुक्त पंकज डहाणे, तिरुपती काकडे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. 

बॅडमिंटन कोर्ट व ओपन जिम यामुळे पोलिसांना कामाच्या ठिकाणीच थोडाफार मिळालेला वेळ स्वतःच्या प्रकृतीसाठी देखील देता येणार आहे. कामाचा ताण असह्य होऊन पोलिसांना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रकार घडत आहेत. अशा प्रसंगावर मात करणारी करणारी हि संकल्पना ठरू शकते. शिवाय पोलिस ठाण्याच्या भिंतींना देखील समाजउपयोगी संदेशाचे माध्यम बनवण्यात आले आहे. यामुळे पोलिस ठाण्याचे रूप देखील पालटले आहे. येत्या काळात हि संकल्पना इतरही पोलिस ठाण्यात राबवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलिस आयुक्तालयाच्या परिसरातल्या अनेक समस्या निकाली काढून रुपडे बदलले आहे. त्यातच पोलिस ठाण्याचाही चेहरा मोहरा बदलला जात असल्याचे समाधान पोलिस कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Policeपोलिस