शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टिटवाळ्यात फार्महाऊसवर दरोड्याचा प्रयत्न

By admin | Updated: November 24, 2015 01:50 IST

टिटवाळा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या म्हस्कळ रस्त्यावर पितृछाया या फार्महाऊसवर रविवारी रात्री ७ च्या सुमारास दोन दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने हल्ला केला

टिटवाळा : टिटवाळा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या म्हस्कळ रस्त्यावर पितृछाया या फार्महाऊसवर रविवारी रात्री ७ च्या सुमारास दोन दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने हल्ला केला. यात त्यांनी रिव्हॉल्व्हरमधून बेछूट गोळीबार केला. त्यात फार्ममालक विलास आचरेकर हे जखमी झाले आहेत. टिटवाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, टिटवाळा मंदिरापासून हाकेच्या अंतरावर म्हसकळ रस्त्यावर आदिवासी वाडीमागे आचरेकर यांचे पितृछाया नावाचे फार्महाऊस आहे. रविवारी जोराचा पाऊस पडत होता. त्याचाच फायदा घेऊन चोरट्याने तेथे येऊन दरवाजा ठोठावला. त्या वेळी विलास आचरेकर, त्यांची पत्नी व मुलगा असे कुटुंब घरात होते. आम्ही चोरी करायला आलो आहोत, जे पण घरात सोनेनाणे, पैसे असतील तर गुपचूप द्या. आम्ही तुम्हाला काहीच करणार नाही, असे सुनावले. परंतु, त्यांनी दरवाजा उघडला नाही, याचा राग आल्याने त्यांनी हॉल व किचनच्या खिडकीतून सहा गोळ्या झाडल्या. नंतर, परत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याला छिद्र पाडून आत पाहणी केली. तेवढ्यात आचरेकर यांनी चोरट्यांच्या हातातील बॅटरी खाली पाडली. त्याच वेळी एकाने फायरिंग केली असता आचरेकर यांच्या उजव्या पायाच्या मांडीला गोळी लागून ते जखमी झाले. या वेळी त्यांनी तत्काळ टिटवाळा पोलीस ठाण्यात संपर्क साधला. पंधरा मिनिटांच्या आत पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत चोरट्यांनी तेथून पळ काढला होता. पोलिसांनी घराचे दार उघडले असता आचरेकर कुटुंब पूर्णपणे घाबरले होते. जखमी विलास यांना कल्याण येथील आयुष रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक, ठाणे ग्रामीण अविनाश अंबुरे व उपविभागीय अधिकारी, मुरबाड हरिश्चंद्र व्हटकर घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेचा जलद गतीने तपास करून लवकरच अज्ञात चोरट्यांना ताब्यात घेण्यात येईल, असे अविनाश अंबुरे यांनी सांगितले. या प्रकारामुळे लगतच्या गावांतील नागरिकांत व फार्महाऊसमालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टिटवाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.