शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमध्ये कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू ;नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 16:20 IST

खारघर सेक्टर १९  मध्ये दोन कावळ्यांचा संशयास्पद मृत्यु झाल्याने खळबळ उडाली आहे.दि. ७ रोजी येथील पोलीस संमिश्र सोसायटी च्या कंपाऊंड मध्ये एक कावळा मृत पावल्याची बाब या परिसरातील रहिवाशांच्या निदर्शनास आली.

- वैभव गायकरपनवेल - खारघर सेक्टर १९  मध्ये दोन कावळ्यांचा संशयास्पद मृत्यु झाल्याने खळबळ उडाली आहे.दि. ७ रोजी येथील पोलीस संमिश्र सोसायटी च्या कंपाऊंड मध्ये एक कावळा मृत पावल्याची बाब या परिसरातील रहिवाशांच्या निदर्शनास आली.दोन दिवसात दुसरा कावळा देखील याठिकाणी मृत पावल्याने यासंदर्भात पालिकेकडे लेखी तक्रार केली आहे.सेक्टर १९ मधील रहिवासी व भाजपच्या खारघर तळोजा मंडळच्या उपाध्यक्ष बिना गोगरी यांनी यासंदर्भात पालिकेकडे तक्रार केली आहे.विशेष म्हणजे सध्याच्या घडीला बर्ड फ्लूचा धोका वाढत चालला आहे. कावळ्यांमध्ये देखील बर्ड फ्लूची लक्षणे आढळल्याची घटना घडल्या असल्याने गोगरी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मृत कावळ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी पालिकेकडे केली आहे.सेक्टर १९ मधील परिसरात दोन व खारघर सेक्टर 4 बेलपाडा व खारघर रेल्वे स्थानक परिसरात अशाच प्रकारे संशयास्पद पक्षी मृत अवस्थेत सापडल्याचे खारघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संजय घरत यांनी सांगितले.मात्र या घटनेचे गांभीर्य पालिका अधिकाऱ्यांनी घेतलेले दिसून येत नाही.पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग अ चे अधिकारी दशरथ भंडारी यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी संबंधित पशु वैद्यकीय विभागाच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगितले.पालिका अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेऊन त्वरित मृत पक्षाचे अवशेष वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्याची गरज असल्याचे बिना गोगरी यांनी सांगितले. पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग अ चे अधिकारी दशरथ भंडारी यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी संबंधित पशु वैद्यकीय विभागाच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईBird Fluबर्ड फ्लू