शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील खड्ड्यांविरोधी मनसेचे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 03:44 IST

गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल मनसेने १५ आॅगस्ट रोजी पुकारलेल्या आंदोलनाला स्थगिती दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ५ सप्टेंबरपर्यंत खड्डे बुजवण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले.

पनवेल : गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल मनसेने १५ आॅगस्ट रोजी पुकारलेल्या आंदोलनाला स्थगिती दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ५ सप्टेंबरपर्यंत खड्डे बुजवण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन ५ सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे मनसेच्या बैठकीत जाहीर करण्यात आले. बैठकीला मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक, जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी, जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, देवेंद्र गायकवाड, अतुल भगत, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ज्योती मालवणकर, सपना देशमुख, वर्षा देशमुख, नाविक सेनेचे संदेश ठाकूर, वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष अभिषेक दर्गे, दिलीप सांगळे, केसरीनाथ पाटील, मनविसेचे राजेश कोळी, शालोम पेणकर आदी उपस्थित होते.दरवर्षी गणेशचतुर्थीच्या काही दिवस आधी महामार्गाच्या दुरु स्तीचे काम हाती घेतले जाते. मात्र, ही मलमपट्टी तकलादू असल्याने अल्पावधीतच रस्त्याची अवस्था जैसे थे होते. मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते इंदापूर या दरम्यान मोठे खड्डे पडल्याने दुर्दशा झाली असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. महामार्गाची दुरवस्था पाहून या महामार्गाला देवेंद्र ते नरेंद्र व्हाया राष्ट्रीय महामार्ग असे नामकरण करण्यात येणार होते. मनसे आणि मनसेची अंगीकृत संघटना महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने १५ आॅगस्ट रोजी हे आंदोलन होणार होते आणि त्याच दिवशी पळस्पे ते इंदापूर या मार्गावर एक लाख वृक्षांची लागवडही करण्यात येणार होती; पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने मनसेला लेखी आश्वासन देण्यात आले आहे. आश्वासनात येत्या ५ सप्टेंबरपर्यंत हा महामार्ग खड्डेमुक्त झाला असेल, असे आदेशच कंत्राटदार सुप्रीम कंपनीला देण्यात आले आहेत, त्यामुळे आंदोलन करू नये, अशी विनंती प्राधिकरणाने केली होती.

टॅग्स :MNSमनसेnewsबातम्या