शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणात पालिकेचा सावळा गोंधळ, परवानाधारकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 03:52 IST

फेरीवाल्यांच्या संदर्भात पालिकेच्या दुटप्पी भूमिकेमुळे परवानाधारक फेरीवाल्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. एकीकडे सर्वेक्षण होणार असल्याचे सांगत असताना, दुसरीकडे मात्र परवानाधारक फेरीवाल्यांवरच कारवाईचा धडाका सुरू आहे.

नवी मुंबई : फेरीवाल्यांच्या संदर्भात पालिकेच्या दुटप्पी भूमिकेमुळे परवानाधारक फेरीवाल्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. एकीकडे सर्वेक्षण होणार असल्याचे सांगत असताना, दुसरीकडे मात्र परवानाधारक फेरीवाल्यांवरच कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणात सावळागोंधळ सुरू असून मर्जीतल्या फेरीवाल्यांना लाभार्थी करण्यासाठी हा प्रकार होत आहे.पालिकेतर्फे सध्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. उपलब्ध मार्केटमध्ये फेरीवाल्यांना स्थान देण्यापूर्वी हे सर्वेक्षण करून पात्र फेरीवाल्यांना परवाना मिळणार आहेत. यामुळे पूर्वी ज्यांना पालिकेने परवाने दिले होते त्यांच्या आशा निर्माण झाल्या. पालिकेचा परवाना असताना त्यांना मार्केटमध्ये जागा देण्यापासून डावलले जात होते.शुक्रवारी कोपरखैरणेच्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई झाली. त्यात परवानाधारक फेरीवाल्यांच्या हातगाड्या व टपºयांची तोडफोड करण्यात आली असल्याचे श्याम कांबळे यांचे म्हणणे आहे. कांबळे यांच्या पत्नीच्या नावे फेरीवाला परवाना असून कोपरखैरणे सेक्टर ८ येथील फेरीवाला भूखंडावर अनेक वर्षांपासून ते व्यवसाय करत आहेत.सदर भूखंडावर अद्ययावत मार्केट उभारणीच्या बहाण्याने तिथल्या सर्वच फेरीवाल्यांना बाहेर काढले होते. यानंतर एक वर्षापासून इमारत बांधून तयार असतानाही फेरीवाल्यांनी पदपथावर व्यवसाय मांडला. दोन दिवसांपूर्वी तेथे पालिकेतर्फे सर्वेक्षण होणार असल्याची नोटीस लावली. यामुळे लवकरच मार्केटमध्ये हक्काची जागा मिळणार या आनंदात फेरीवाले असतानाच कारवाई झाली आहे. यामध्ये १५ ते २० परवानाधारक फेरीवाल्यांच्या टपºया व हातगाड्यांची तोडफोड करण्यात आली. पालिकेच्या या दुटप्पी भूमिकेबाबत संताप व्यक्त करत सर्वेक्षणात सावळागोंधळ असल्याचा आरोप कांबळे यांनी केला. तर अपंग असल्याकारणाने उदरनिर्वाहासाठी परवाना घेऊन सुरू केलेला व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचा संताप चंद्रकांत धनावडे यांनी व्यक्त केला. या कारवाईमागे कटकारस्थान असून अधिकाºयांच्या मर्जीतल्या अनधिकृत फेरीवाल्यांना पालिकेचे ‘लाभार्थी‘ बनवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोप कांबळेंनी केला. परवाना असतानाही पालिकेच्या अधिकाºयांनी केलेल्या कारवाईविरोधात ते पोलिसांकडेही तक्रार करण्यासाठी गेले होते. वेळोवेळी पालिकेचे शुल्क भरूनही झालेल्या कारवाईमुळे प्रशासनाकडून आपली फसवणूक झाल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार देऊन पिटाळून लावल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे; परंतु यासंदर्भात विभाग अधिकारी अशोक मढवी यांच्याशी संपर्क साधला असता तो झाला नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई