शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

धाकले आयलंडवर नवी मुंबई विमानतळाची निरीक्षण रडार यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 08:53 IST

सिडकोने कंबर कसली : सीआरझेड प्राधिकरणाने दिली परवानगी

- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर २०२४ पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानोड्डाण करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. त्यादृष्टीने सिडको आणि विकास कंपनी अदानी समुहाने युद्धपातळीवर कामे सुरू केली आहेत. आता बेलापूरनजीकच्या शहाबाज येथील धाकले आयलंडवर जून २०२४ पर्यंत निरीक्षण रडार यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

विमानतळावर ये-जा करणाऱ्या सर्व प्रकारच्या विमानांच्या संचालनासाठी अत्यावश्यक असलेली ही रडार यंत्रणा आहे. ती बसविण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या असून, सीआरझेड प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबतचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला आहे.

...ही कामे करणार    रडारसाठी लागणारी जागा - ५० बाय ५० मीटर अर्थात ०.५० हेक्टर     जेटी - ४५ मीटर बाय १५ मीटर    जेटीला जोडणारा रस्ता - १२१ मीटर बाय ८ मीटर    जेटीचा अंतर्गत रस्ता : २७ बाय आठ मीटर    याशिवाय मलबार शिपयार्डपर्यंत हे आयलंड रस्त्याने जोडण्यात येणार आहे.

६० दशलक्ष प्रवासी ये-जा करण्याचा अंदाजभारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या देखरेखीखाली ही कामे केली जाणार आहेत. विमानतळ प्राधिकरणाच्या अंदाजानुसार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर येथे प्रवासी प्रतिवर्षी ६० दशलक्ष प्रवासी ये - जा करतील, असा अंदाज आहे. त्यानुसार विमानांचे किमान ३ नॉटिकल मैलावर उच्च तीव्रतेच्या धावपट्टीच्या ऑपरेशनसाठी रडार यंत्रणा बसविण्याची योजना आहे.यासाठी प्राधिकरणाने विमानांच्या चोख संचालनासाठी किमान ३ विमानतळ सर्वेक्षण रडार प्रणाली बसविण्यासाठी योजना आखली आहे. त्यापैकी पहिले रडार जून २०२४ पर्यंत बसविण्यात येणार आहे, जेणेकरून त्याची तपासणी आणि चाचणी करून येथून ये-जा करणाऱ्या सर्व प्रकारच्या विमानांचे निरीक्षण करणे सोपे होईल.

धाकले आयलंडचीच जागा का निवडली ? धाकले आयलंड पनवेल खाडीने वेढलेले आहे. बेलापूरची महागाव जेटी आणि सीवूड टर्मिनल येथून जवळच असून, येथून सहज ये-जा करता येणार आहे. परिसरात कोणतीही मानवी वस्ती आणि विकासकामे सुरू नाहीत. रडार यंत्रणा बसविण्यासाठी ०.५३१५ हेक्टर खारफुटीसह ६० झाडांची कत्तल करावी लागणार आहे.

टॅग्स :Airportविमानतळcidcoसिडको