शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘नो सर्व्हिस, नो टॅक्स’ मोहिमेला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 01:05 IST

खारघर परिसरात आजही रस्ते, पाणी आदी प्राथमिक सुविधा सिडको प्रशासनाकडून दिल्या जात असताना मालमत्ता कराच्या रूपाने पालिकेला अवाढव्य टॅक्स येथील नागरिकांनी का द्यावा?

पनवेल  - खारघर परिसरात आजही रस्ते, पाणी आदी प्राथमिक सुविधा सिडको प्रशासनाकडून दिल्या जात असताना मालमत्ता कराच्या रूपाने पालिकेला अवाढव्य टॅक्स येथील नागरिकांनी का द्यावा? सिडकोकडे येथील नागरिक सेवा कर जमा करत असताना केवळ कचरा उचलण्याच्या कामासाठी मागील चार वर्षांचा मालमत्ता कर का भरावा, असा प्रश्न खारघर येथे रविवारी पार पडलेल्या बैठकीत नागरिकांनी उपस्थित केला.महाविकास आघाडीच्या वतीने मालमत्ता करासंदर्भात येथील रहिवाशांचे अभिप्राय घेण्यात आले. या वेळी आमदार बाळाराम पाटील, स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, काँग्रेसचे आर. सी. घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, नगरसेवक गुरुनाथ गायकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र करावकर आदी उपस्थित होते. खारघर परिसरात लवकरच मालमत्ता कराच्या नोटीस येणार असल्याची माहिती प्राप्त होताच महाविकास आघाडीच्या वतीने खारघरमध्ये रविवार मालमत्ता करासंदर्भात खुल्या चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. सिडकोकडून खारघरमध्ये केवळ साठ टक्के विकासकामे झाली आहेत. अजूनही अनेक नोड अविकसित आहेत. आजही नागरिक सिडकोकडे सेवा कर भरणा करतात. पालिका केवळ कचरा उचलण्याचे काम करीत असून कोणत्या आधारावर चार वर्षांच्या मालमत्ता कराची नोटीस पाठवीत आहे.सत्ताधिकारी केवळ मूग गिळून बसले आहेत, असा आरोप या वेळी सत्ताधिकाऱ्यांवर करण्यात आला. पालिका नागरी सुविधांचे काम करण्याऐवजी मालमत्ता कराची मागणी करून नागरिकांवर अन्याय करीत आहे. खारघरवासी हे सहन करणार नाहीत, असा इशारा दिला. पालिका हद्दीत मालमत्ता कराची नोटीस पाठवून पालिका केवळ शिदोरी गोळा करण्याचे काम करीत असेल तर पालिकेच्या विरोधात लवकरच भव्य मोर्चा काढण्याचा इशारा आमदार बाळाराम पाटील यांनी दिला.खुली चर्चा यशस्वी करण्यासाठी आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक गुरुनाथ गायकर, बी. ए. पाटील, कॅप्टन एच. एस. कलावत, संतोष गायकर, रामचंद्र देवरे यांनी मेहनत घेतली. या खुल्या चर्चेत खारघरमधील  नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.खारघर परिसरात लवकरच मालमत्ता कराच्या नोटीस येणार असल्याची माहिती प्राप्त होताच महाविकास आघाडीच्या वतीने खारघरमध्ये रविवार मालमत्ता करासंदर्भात खुल्या चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. 

टॅग्स :TaxकरNavi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगड