शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

धुवाधार पावसात रविवारची धम्माल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 02:00 IST

पावसाने सलग दुसऱ्या रविवारी हजेरी लावून निसर्गप्रेमींच्या उत्साहात भर टाकली आहे. नवी मुंबईत दिवसभरात ३९.६५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे

नवी मुंबई : पावसाने सलग दुसऱ्या रविवारी हजेरी लावून निसर्गप्रेमींच्या उत्साहात भर टाकली आहे. नवी मुंबईत दिवसभरात ३९.६५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर मोरबे परिसरातही कोसळणाºया पावसामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.शनिवारी मध्यरात्रीपासून राज्याच्या अनेक भागात सुरू झालेला पाऊस रविवारी रात्रीपर्यंत सुरू होता. यामुळे निसर्गप्रेमींचा रविवारच्या सुट्टीचा दिवस पावसाचा मनसोक्त आनंद घेण्यात गेला. नवी मुंबईत रविवारी दिवसभरात ३९.६५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये बेलापूर विभागात ३५ मि.मी., नेरुळ विभागात ३८.४ मि.मी., वाशी विभागात ४०.२ मि.मी. तर ऐरोली विभागात सर्वाधिक ४५ मि.मी. पाऊस पडला. मात्र दिवसभर पाऊस कोसळत असताना वारे नसल्याने वृक्ष कोसळल्याची अथवा इतर कोणती दुर्घटना घडल्याचा गंभीर प्रकार घडला नाही, तर अपवादात्मक ठिकाणे वगळता कुठेही पाणी तुंबल्याचाही प्रकार घडला नाही.मोरबे धरण परिसरातही अद्यापपर्यंत एकूण ४५३. ६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मागील काही दिवसात धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होवून ७६ मीटर झाली आहे. मात्र धरणातील पाण्याची क्षमता ८८ मीटरपर्यंतची असल्याने ते भरून वाहण्यासाठी परिसरात अद्यापही अधिक पावसाची आवश्यकता आहे.दिवसाची सुरवातच ढगाळ वातावरणामुळे झाल्याने अनेकांनी सकाळीच पावसाळी सहलीचा बेत आखून छोट्या-मोठ्या ठिकाणांकडे धाव घेतली. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव काही ठिकाणी पर्यटकांना प्रवेश करण्यास मज्जाव घालण्यात आलेला आहे. याकरिता त्याठिकाणी पोलिसांचाही चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.यामुळे काहींनी घराच्या आवारातच पावसात भिजून आनंद घेतला. त्यात लहान मुला-मुलींसह तरुणांचाही उत्साह दिसून आला. नवी मुंबईसह लगतच्या मुंबई, ठाणे परिसरातही दिवसभर पाऊस होता. यामुळे कामानिमित्ताने घराबाहेरपडलेल्यांची मात्र दैना होवून, ओलेचिंबहोवूनच त्यांना प्रवास करावा लागला.रविवारी सकाळपासून अविरत कोसळणाºया पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. ऐरोली, घणसोली आणि कोपरखैरणे परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. अनेक भागातील बैठ्या घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. नोसिल नाका येथील झोपडपट्टी जलमय झाली होती, तर घणसोली गवळीदेव डोंगर परिसरात ठिकठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. या परिस्थितीत पालिकेच्या आपत्कालीन विभागाची चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून आले.वादळी पावसाने आज सकाळपासून दिवसभर थैमान घातले. ठिकठिकाणी झाडाच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्यामुळे काही भागातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. सुमारे तीन तासांच्या अथक परिश्रमाने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. ऐरोली सेक्टर २0 येथील स्मशानभूमीलगतचे गटार, दिघा बिंदुमाधव नगरातील मुकुंद कंपनीकडून आलेला नाला भरून ओसंडून वाहत होता. रबाले, कोपरखैरणे आणि घणसोली रेल्वे स्थानकाच्या पादचारी आणि वाहतूक भुयारी मार्गात पाणी साचल्याने पादचाºयांचे आणि वाहनधारकांचे हाल झाले. घणसोली गावातील गुनाले तलाव आणि छत्रपती शिवाजी महाराज तलाव भरल्याने त्यातील पाणी रस्त्यावर आले होते. घणसोली गावात ताराई नगरात सखल भागात पाणी साचले होते. ऐरोली सेक्टर ३ येथील बस स्थानकात सुमारे एक ते दीड फूट पाणी साचले होते. तर ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-नेरूळ, ठाणे-पनवेल आणि वाशी-ठाणे लोकलचे वेळापत्रक काहीसे कोलमडले.पावसाचा जोर वाढल्याने सायन-पनवेल महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीला फटका बसला आहे. कळंबोली, खारघर, हिरानंदानी, बेलपाडा, उरण फाटा या ठिकाणी रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे कोपरा उड्डाणपूल, कळंबोली, कामोठे बस थांबा, बेलपाडा आदी ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या कामामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होत आहे. त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले.