शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपीची गळफास लावून आत्महत्या, व्यसनाधीनतेत कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 02:53 IST

घरात डांबून ठेवल्याने मद्यपीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दारूच्या आहारी गेलेल्या पतीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी बंद घरात ठेवण्यात आले होते. मद्यपान करायला न मिळाल्याने त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

नवी मुंबई : घरात डांबून ठेवल्याने मद्यपीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दारूच्या आहारी गेलेल्या पतीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी बंद घरात ठेवण्यात आले होते. मद्यपान करायला न मिळाल्याने त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.राहुल बजरंग गोडसे (३७) नेरुळ सेक्टर १० येथे पत्नी व लहान मुलीसह राहायला होते. पती-पत्नी दोघेही बँकेत कामाला आहेत, परंतु काही दिवसांपासून राहुल यांना दारूचे व्यसन लागले होते. नोकरीला जाण्याऐवजी ते मद्यपान करून परिसरात फिरायचे. त्यांच्या व्यसनामुळे कुटुंबाला मनस्ताप सहन करायला लागत होता. यामुळे त्यांना घरात डांबून पत्नी नोकरीला जायची. दरम्यान, शेजाºयांकडे घराची चावी देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवले जायचे. सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास त्यांना घरात डांबून ठेवले असता, त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. सदर घटनेची नोंद नेरुळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, तर व्यसनाच्या आहारी गेल्याने दारू प्यायला न मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज नेरुळ पोलिसांनी वर्तवला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याNavi Mumbaiनवी मुंबई